Shocking : नूडल्समध्ये आढळले किडे अन् बुरशी, लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ

Pimpari Chinchwad News : पिंपरी-चिंचवड परिसरात खरेदी केलेल्या पॅकबंद नूडल्सच्या पाकिटात बुरशीसदृश थर आणि कीटक आढळल्याचा ग्राहकाचा आरोप. कंपनी आणि अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
PIMPRI NOODLES CONTROVERSY: MOLD AND INSECTS ALLEGEDLY FOUND IN SEALED PACKET, COMPLAINT FILED WITH FDA
PIMPRI NOODLES CONTROVERSY: MOLD AND INSECTS ALLEGEDLY FOUND IN SEALED PACKET, COMPLAINT FILED WITH FDASaam Tv
Published On
Summary
  • पिंपरी-चिंचवडच्या बोपखेल परिसरात धक्कादायक प्रकार

  • नूडल्सच्या पॅकेटमध्ये बुरशी आणि कीटक आढळल्याचा आरोप

  • संबंधित नूडल्सचे पाकीट मुदतबाह्य नसल्याचा ग्राहकाचा दावा

  • पॅकेटमधून दुर्गंधी येत असल्याचेही ग्राहकाने सांगितले

  • कंपनी आणि अन्न व औषध प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल

गोपाळ मोटघरे, पिंपरी चिंचवड

लहान मुलांना नूडल्स हा पदार्थ फार आवडतो. अगदी ५ ते १० मिनिटांमध्ये होणार हा पदार्थ शाळेच्या डब्याला किंवा दररोज नाश्तासाठी बनवून दिले जातात. मात्र पॅक बंद नूडल्स हे मुलांसाठी जीवघेणे देखील ठरू शकतात. अशीच एक घटना पिंपरीमध्ये घडली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बोपखेल परिसरात एका व्यक्तीने दुकानातून खरेदी केलेल्या पॅक बंद नूडल्सच्या पाकिटात बुरशीसदृश थर आणि कीटक दिसून आल्याचा आरोप संबंधित ग्राहकाने केला आहे. या घटनेनंतर ग्राहकांमधून पॅकेट बंद फूडवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नेमकं काय घडलं?

नांदेडच्या बोपखेल परिसरात राहणाऱ्या महेंद्र भिंगारदिवे यांच्या कुटुंबीयांनी नूडल्सच पॅकेट खरेदी केलं होत. ते शिजवण्यासाठी उघडण्यात आलं. मात्र पॅकेट उघडताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. संबंधित पाकीट मुदतबाह्य होण्या आधीच नूडल्सवर काळपट आणि हिरवट रंगाचा बुरशीसदृश थर आणि कीटक दिसून आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

PIMPRI NOODLES CONTROVERSY: MOLD AND INSECTS ALLEGEDLY FOUND IN SEALED PACKET, COMPLAINT FILED WITH FDA
New Bride Ritual : आषाढ महिन्यात नवविवाहितेला माहेरी का पाठवतात? काय आहे परंपरा

नूडल्सला दुर्गंधी

तसेच त्यामधून दुर्गंधी येत असल्याचाही दावा महेंद्र भिंगारदिवे या ग्राहकाने केला आहे. लहान मुलांसह अनेक जण इन्स्टंट नूडल्सचे चवीने खातात. त्यामुळे पॅकबंद उत्पादनामध्ये अशा प्रकारे खराब पदार्थ आढळल्याच्या आरोपामुळे अन्नसुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

PIMPRI NOODLES CONTROVERSY: MOLD AND INSECTS ALLEGEDLY FOUND IN SEALED PACKET, COMPLAINT FILED WITH FDA
Hair Care Tips : केसांचे गळणे होईल कायमचे बंद! मेथी दाण्यांमध्ये 'ही' १ गोष्ट मिसळून लावा; एका आठवड्यात दिसेल जादू

FDA कारवाई करणार का?

संबंधित ग्राहकाने नूडल्सच्या पाकिटावरील बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, ‘बेस्ट बिफोर’ तारीख आणि FSSAI परवाना क्रमांक तपासून कंपनी आणि अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. आता या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तसेच अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले तुकाराम मुंढे नेमकी काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com