3175 खिळ्यांच्या साहाय्याने साकारले छत्रपती शिवाजी महाराज; पहा Photo

कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून या कलेचं कौतुक करण्यात आलं आहे.
3175 खिळ्यांच्या साहाय्याने साकारले छत्रपती शिवाजी महाराज; पहा Photo
3175 खिळ्यांच्या साहाय्याने साकारले छत्रपती शिवाजी महाराज; पहा PhotoSaam TV
Published On: 

आज संपुर्ण देश छत्रपती शिवाजी महाराजांची ३९२ वी जयंती साजरा करतोय. महाराष्ट्रात अनेक ठिकठिकाणी मोठ-मोठे उत्सव पाहायला मिळत आहेत. अनेक जण आपल्या कला गुण दाखवत आहेत. असाच एक पुण्यातील अवलिया कलाकाराने ३१७५ खिळ्यांच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र बनवले आहे.

या कलेला थ्रेड आर्ट म्हणून ओळखलं जाते. त्या संबंधीत तरुणाचं नाव आहे सुशिल देशमुख. सुशील हा मुळचा बुलडाणा येथील असून पुण्यात सध्या वास्तवास आहे. त्याला कलेची प्रचंड आवड असून त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक चित्र खिळ्यांच्या साह्याने बनवले आहेत.

कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून या कलेचं कौतुक करण्यात आलं आहे.

आज शिवजयंतीचं निमीत्त साधत त्याने भव्य अशी तब्बल 3175 खिळे ठोकून पेंटींग तयार केली आहे. त्याची ही कला आज कोथरुड येथील शिवाजी पुतळ्याजवळ शिवजयंती निमीत्त प्रदर्शनास ठेवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.