धक्कादायक! नवी मुंबईतील शाळेतील विद्यार्थ्यांना शौचालयात भांडी घासायला लावली; प्रकार मोबाईलमध्ये कैद | Panvel

Poor Hygiene in Panvel School: पनवेल महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांकडून शौचालयात ताट धुतले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओमुळे ग्रामस्थांत संताप आणि व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
PANVEL SCHOOL SHOCKER
PANVEL SCHOOL SHOCKERSaam TV News
Published On

पनवेल शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा आणि व्यवस्थापनाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. शाळेतील विद्यार्थी थेट शौचालयात आणि बेसिनमध्ये ताट धुताना दिसत आहे. शाळेमध्ये दोन मावश्या नियुक्त असताना सुद्धा विद्यार्थीच ताट धुताना दिसत असल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. हा सर्व प्रकार साम टीव्हीच्या कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या श्री गणेश विद्यामंदिर क्रमांक सहा धाकटा खांदा या शाळेतून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विद्यार्थी जेवण केल्यानंतर शौचालयात जात आहेत. तसेच शौचालयातील पाण्याने ताट धुवून घेत आहेत. तर, काही विद्यार्थी बेसिनमध्ये ताट धुवून घेत आहेत. विशेष म्हणजे या शाळेमध्ये दोन मावश्या नियुक्त असूनही विद्यार्थीच स्वतःचे ताट धुताना दिसून येत आहेत.

PANVEL SCHOOL SHOCKER
Shocking: प्रसिद्ध व्यावसायिकानं गोळ्या झाडून स्वत:ला संपवलं; फेसबुक लाईव्हवर सांगितलं आत्महत्येचं कारण

शौचालयाच्या पाण्याचा वापर करून जेवणाची भांडी धुणे, ही आरोग्याच्या दृष्टीने गंभीर आणि धोकादायक बाब आहे. तरी देखील मुलांना हे काम करण्यासाठी भाग पाडले जात आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच हा धक्कादायक प्रकार समोर आला. हा व्हिडिओ व्हायरल होताच ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

PANVEL SCHOOL SHOCKER
RBI Action: बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या बँकेवर RBIची कारवाई, ग्राहकांचे पैसे अडकणार? नेमकं कारण काय?

मावश्या असूनही मुलांना ताट धुण्यास का भाग पाडले? असा सवाल उपस्थित होत आहे. या व्हिडिओ पनवेल महानगरपालिकेचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे शाळेच्या भीतींवर भाजप पक्षाचे बॅनर दिसून येत आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र शाळेच्या भिंतीवर भाजपचं राजकारण आणि बॅनरबाजी यातून स्पष्टपणे दिसत आहे. यावरून महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचा निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com