भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी
तुम्ही खात असलेले नूडल्स डर्टी पद्धतीने बनवले जाताहेत. याच डर्टी नूडल्सच्या कंपनीचा मनसेनं पर्दाफाश केलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट..जीभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्ही चमचमीत चायनीज खात असाल तर सावधान.! तुम्ही खात असलेलं चायनीज डर्टी पद्धतीनं बनवलं जात असल्याचा व्हिडीओ समोर आलाय...तुम्हीच पाहा तुम्ही खात असलेलं चायनीज कसं बनवलं जातंय.
ही दृश्य पाहून तुमची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. ही दृश्ये आहेत पनवेलमधील नूडल्स बनवणाऱ्या कंपनीतील. या कंपनीत नूडल्स बनवण्यासाठी वापरण्यात येणारं ड्रममधील घाण पाणी, अस्वच्छ खाद्यतेल, माशा बसलेला आटा हे सगळं पाहून तुम्हाला उलटी झाल्याशिवाय राहणार नाही. हा संतापजनक प्रकार मनसेनं समोर आणलाय.
आधी कामोठ्यातील कंपनीत सॉस बनवण्याचा आणि आता डर्टी नूडल्स बनवण्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे तुम्ही नूडल्स विकत घेत नाहीत तर आजार विकत घेत आहात. त्यामुळे तुमच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई करून डर्टी प्रकाराला आळा घालायला हवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.