लोकलमध्ये दहशत, महिलेला धावत्या ट्रेनमधून ढकललं

Mumbai Local Train: पनवेलमधील एका घटनेनं लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय... लोकलच्या प्रवासात नेमकं काय घडलं? महिलांच्या डब्ब्यात दहशत का पसरलीय?
Police and passengers intervene after a woman is pushed from a moving Panvel local train, highlighting the urgent need for women’s safety on Mumbai trains.
Police and passengers intervene after a woman is pushed from a moving Panvel local train, highlighting the urgent need for women’s safety on Mumbai trains.Saam Tv
Published On

या नराधमाला नीट पाहा... हाच तो नराधम ज्यानं धावत्या ट्रेनमधून एका मुलीला ढकलून दिलयं....मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलमधून दररोज लाखो जण प्रवास करतात...मात्र याचं लोकलच्या प्रवासात घडलेल्या घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय....

दरम्यान माथेफिरूच्या कृत्यानं ट्रेनमधील महिलांनी आरडाओरडा सुरु केला... डोळय़ांसमोर एका मुलीला ट्रेनमधून ढकलून दिल्याचे पाहून महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं... महिलांनी चेन खेचून गाडी थांबवली...त्याआधी महिलांनी रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली...ट्रेनमधील सहप्रवाशांनीही माथेफिरूला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलयं...

दरम्यान ट्रेनमधून पडल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या तरुणीने कसाबास वडिलांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तातडीने तिला शोधून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्या तरूणीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे... मात्र या घटनेनं पुन्हा एकदा मुंबईच्या लाईफलाईनमध्ये महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय... या घटनेनंतर तरी ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवणार का? हा खरा प्रश्न आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com