Panvel : पनवेलमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस, १० जणांवर हल्ला; ६४ वर्षीय व्यक्तीच्या डोळ्याचा घेतला चावा

Panvel Kamothe News : कामोठे सेक्टर-१० परिसरात भटक्या कुत्र्याने १० जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. दोन लहान मुले आणि एका ज्येष्ठ नागरिकास गंभीर दुखापत झाली असून पनवेल महापालिकेने संबंधित कुत्र्याला ताब्यात घेतले आहे.
KAMOTHE STRAY DOG ATTACK: 10 PEOPLE INJURED, CHILDREN AND SENIOR CITIZEN SERIOUSLY HURT IN PANVEL
KAMOTHE STRAY DOG ATTACK: 10 PEOPLE INJURED, CHILDREN AND SENIOR CITIZEN SERIOUSLY HURT IN PANVELSaam Tv
Published On
Summary
  • कामोठे सेक्टर-१० परिसरात भटक्या कुत्र्याचा १० जणांवर हल्ला

  • दोन लहान मुले आणि ६४ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी

  • पनवेल महापालिकेने संबंधित भटक्या कुत्र्याला पकडून ताब्यात घेतले

  • घटनेनंतर परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

विकास मिरगणे, नवी मुंबई

पनवेलच्या कामोठे परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कामोठे सेक्टर-१० परिसरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशातच आता एका भटक्या कुत्र्याने १० जणांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन लहान मुलांसह एक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने नागरिक संतप्त झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील मुले नेहमीप्रमाणे खेळत असताना अचानक रस्त्यावरील कुत्र्याने त्यांच्यावर झडप घातली. मुलांचा किंकाळ्या ऐकून त्यांना वाचवण्यासाठी ६४ वर्षीय कृष्णा म्हात्रे धावले. मात्र मुलांसाठी मदतीचा हात पुढे करायला गेलेल्या म्हात्रे यांच्यावरही कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याने त्यांच्या डोळ्याजवळ चावा घेतल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

KAMOTHE STRAY DOG ATTACK: 10 PEOPLE INJURED, CHILDREN AND SENIOR CITIZEN SERIOUSLY HURT IN PANVEL
Health Care Tips : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

तसेच या कुत्र्याने सहा वर्षाच्या एका मुलाच्या गालाचा चावा घेतला असून आणखी एका ज्येष्ठ नागरिकाच्या हातालाही गंभीर दुखापत झाली आहे. इतर काही नागरिकांनाही किरकोळ जखमा झाल्याची माहिती मिळाली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

KAMOTHE STRAY DOG ATTACK: 10 PEOPLE INJURED, CHILDREN AND SENIOR CITIZEN SERIOUSLY HURT IN PANVEL
Snake : पावसाळ्यात सापांना 'ही' ६ झाडे आवडतात, कारण वाचून येईल चक्कर

घटनेची माहिती मिळताच पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ कारवाई करत संबंधित भटक्या कुत्र्याला पकडले. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कामोठे परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढला असून यापूर्वीही अशा स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत. शिंदेसेनेचे कामोठे शहर प्रमुख रोकेश गवारी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेने विशेष मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com