Pankaja Munde on Dhananjay Munde: आम्ही कुठलीही जमीन विकण्यासाठी राजकारणात नाहीत; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा

पुन्हा एकदा मुंडे बहीण भावांकडून बाजार समिती निवडणुकीवरून एकमेकांवर, आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जात आहेत.
pankaja munde and dhananjay munde
pankaja munde and dhananjay munde SaamTvNews
Published On: 

Beed News: भगवान गडाच्या पायथ्याशी मुंडे बहिण भावामध्ये मनोमिलन झाल्यानंतर, आता पुन्हा एकदा मुंडे बहीण भावांकडून बाजार समिती निवडणुकीवरून एकमेकांवर, आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जात आहेत. (Latest Marathi News)

परळीत या बघा आणि तेथील व्यापाऱ्यांना विचारा त्यांचे किती हाल आहेत? त्याचबरोबर आम्ही कुठलीही जमीन विकण्यासाठी राजकारणात नाहीत. असं म्हणत पंकजा मुंडेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीकास्त्र डागल. त्या बीडच्या अंबाजोगाई येथे बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

pankaja munde and dhananjay munde
Mumbai Crime: पोलीस काहीच करू शकणार नाही म्हणत तरुणाला तलवार, हॉकी स्टिकने बेदम मारहाण

यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, की राजकारणात काही लोक हे फिरत्या ढालीचे असतात. मागच्या वेळेस आम्ही पडलो, मात्र या वेळेस पॅनल पडणार नाही. याची काळजी आम्ही घेणार आहोत. यांना शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्याचे काहीच घेणं देणं नाही. त्यांना आपला स्वार्थ साधायचा असतो.

मात्र आम्हाला असे पसंद नाही ,आम्ही समाजकारण करण्यासाठी राजकारणात आहोत. आम्ही कुठलीही जमीन विकण्यासाठी राजकारणात नाहीत. असे म्हणत पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडेंवर विविध सुनावले. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) विविध विषयांना अनुसरून टीकास्त्र डागल.

pankaja munde and dhananjay munde
Weather Forecast Today: विदर्भावर पुन्हा गारपीटीचं संकट! येत्या २ ते ३ दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

आष्टी-कडा बाजार समितीवर भाजपची एकहाती सत्ता

बीडमधील आष्टी-कडा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली. बाजार समितीवर भाजपने एकहाती वर्चस्व मिळविले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा बाजी मारत १८ पैकी १२ जागांवर वर्चस्व मिळवलं आहे.

बीड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. गेल्या निवडणुकीत जवळपास ६ बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. तर ३ ठिकाणी भाजपची सत्ता राहिली आहे. अशातच एक निवडणूक बिनविरोध झाल्याने आता उर्वरित निवडणूकीत कोण बाजी मारणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.