Maharashtra MLC Oath : मोठी बातमी! पंकजा मुंडेंसह विधान परिषदेच्या ११ सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ; पाहा VIDEO

Maharashtra MLC Oath Taking Ceremony : पंकजा मुंडे यांच्यासह विधानपरिषेदवर निवडून आलेल्या ११ सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे.
Maharashtra MLC Oath Taking Ceremony
Maharashtra MLC Oath Taking CeremonySaam TV
Published On

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात विधानपरिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीचे ०९ आणि महाविकास आघाडीचे ०२ उमेदवार निवडून आले. आज या सर्व ११ विजयी उमेदवारांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना शपथ दिली आहे. विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडलाय.

Maharashtra MLC Oath Taking Ceremony
Maharashtra Governor : मोठी बातमी! सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचा पदभार

शपथ घेतलेल्या उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे ५, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी २ सदस्यांचा समावेश आहे. याशिवाय शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या एका विधानपरिषद सदस्यांनी देखील आमदारकीची शपथ घेतली आहे. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होईल, असं सांगितलं जात होतं.

मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर करून या निवडणुकीत ट्विस्ट आणला. त्यामुळे निवडणूक घ्यावीच लागली. दरम्यान, निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने ९ उमेदवार उभे केले. तर विरोधी महाविकास आघाडीचे ३ उमेदवार रिंगणात उतरवले. त्यामुळे १२ वा उमेदवार कुणाचा विजयी होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं.

अखेर निवडणुकीत महायुतीचे सर्वच ०९ उमेदवार निवडून आले. तर महायुतीला केवळ २ जागांवर विजय मिळवता आला. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमका कोण विजयी होणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेर, मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली निवडणुकीत काँग्रेसची ८ मतं फुटल्याचं दिसून आले होते.

कोणत्या ११ आमदारांनी घेतली शपथ?

  • पंकजा मुंडे – भाजप

  • योगेश टिळेकर – भाजप

  • अमित गोरखे – भाजप

  • परिणय फुके – भाजप

  • सदाभाऊ खोत – भाजप

  • भावना गवळी – शिंदे शिवसेना

  • कृपाल तुमाने – शिंदे शिवसेना

  • शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

  • राजेश विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

  • प्रज्ञा सातव – काँग्रेस

  • मिलिंद नार्वेकर – उद्धव ठाकरे पक्ष

Maharashtra MLC Oath Taking Ceremony
Maharashtra Governor: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण?, जाणून घ्या एका क्लिकवर सर्वकाही

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com