खासदारांच्या बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत ठाकरेसेनेला आणखी एक झटका देण्याचा इशारा दिलाय... ऑपरेशन टायगर एकीकडे फत्ते झालं असतानाच या बंडखोरीच्या धक्क्यातून सावरण्याआधीच ठाकरेसेनेला दुसरा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरु झालीय...आणि याला कारण ठरलयं....एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केलेलं वक्तव्य...शिंदे नेमकं काय म्हणाले पुन्हा ऐका...
6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरेसेनेचे 14 आमदारही फुटणार असल्याची चर्चा होती... त्यामुळे 22 जूनला उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक घेतली... मात्र या बैठकीला तीन आमदारांनी दांडी मारल्यानं फुटीच्या चर्चांना आणखी उधाण आलं... मात्र ठाकरेसेनेच्या आमदारांनी बैठकीला उपस्थित न राहण्यामागील कारणं जाहीरपणे सांगितल्यानंतर दुसऱ्याच एकाच बंडाची चर्चा रंगलीय...शिंदेसेनेच्या नेत्यांनी ठाकरेसेनेतील नगरसेवकांच्या संभाव्य फुटीवर मोठं विधान केलयं... त्यामुळे आता ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन बीएमसी होणार, अशी चर्चा सुरु झालीय..
ठाकरेसेनेकडे मुंबई महापालिकेत 65 नगरसेवक आहेत.. त्यात शिंदेसेनेचे नगरसेवक किरण लांडगेंनी ठाकरेसेनेचे 20 नगरसेवक संपर्क असल्याचं विधान केल्यानं ठाकरेसेनेत संभाव्य बंडाखोरीमुळे अस्वस्थता पसरलीय...
त्यामुळे या नगरसेवकांमधील बंडखोरी ठाकरेसेनेची ताकद आणखी कमी करण्यास कारणीभूत ठरेल...हे निश्चित... त्यामुळे आमदारांसह नगरसेवकांची संभाव्य बंडखोरी ठाकरे कशी रोखतात? हे पाहणं महत्त्वाचं आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.