Mumbai Fire News : गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू, गोरेगाव पश्चिमेकडील प्रेमनगरमधील घटना

Mumbai News : हरीश बेचैन चव्हाण (५५ वर्षे) असं आगीत होरपळून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
 Mumbai Fire
Mumbai FireSaam Tv
Published On

संजय गडदे

Mumbai News : मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेकडील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. जेवण बनवण्यासाठी गॅस स्टोव्ह सुरू केला असता एलपीजी गॅस सिलिंडरला गळती झाली. ज्यामुळे लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना आज (सोमवारी) सकाळी घडली आहे.

हरीश बेचैन चव्हाण (५५ वर्षे) असं आगीत होरपळून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोरेगाव पोलिसांनी मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. तसेच याप्रकरणी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

 Mumbai Fire
Dombivli News : वाढदिवसाचं दणक्यात सेलिब्रेशन केलं, पण दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी तरुणाला शोधून कोठडीत टाकलं

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेकडील प्रेमनगर परिसरात हरीश चव्हाण आणि त्याचा एक साथीदार आज (सोमवारी) सकाळी कामावर निघण्यापूर्वी घरी जेवण बनवण्याची तयारी करत होते.  (Mumbai News)

 Mumbai Fire
Delhi Honest Thieves : बंदुकीच्या धाकावर जोडप्याला लुटायला आले, अचानक चोरातील 'माणूस' जागा झाला; पुढे काय झालं? पाहा VIDEO

यासाठी लाईटरने शेगडी पेटवण्याचा प्रयत्न केला असता आगीचा भडका उडाला ही आग विझवण्याचा प्रयत्न करत असतानाच हरीश चव्हाण यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. यात हरी श चव्हाण हे भाजून गंभीर जखमी झाले.

त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीने हरीश यांना वाचवण्याचा प्रयत्नही केला मात्र भाजलेल्या जखमा जास्त असल्यामुळे हरीश यांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com