Mumbra Water Supply News : मुंब्रा परिसरात आज पाणीपुरवठा हाेणार नाही; जाणून घ्या कारण

नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
mumbra
mumbrasaam tv

Mumbra News : मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत मुंब्रा रेल्वे फास्ट ट्रॅकवरील पुलालगत ३५० मी. मी.व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची गळती काढण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत १२ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे आजचा (गुरूवार) पाणीपूरवठा रात्री ९ पर्यंत बंद राहील असे पालिकेने कळविले आहे. (Maharashtra News)

mumbra
Nitesh Rane : क-हाडातील स्फाेट गॅस सिलेंडरचा नव्हे, बाॅम्ब निर्मितीचा नितेश राणेंना संशय; एटीएसच्या तपासाची मागणी

या काळात रेतीबंदर, दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, मुंब्रादेवी, जीवनबाग, ठाकूरपाडा, आनंद कोळीवाडा, सम्राट नगर, संजय नगर, गावदेवी परिसरात होणारा पाणीपुरवठा बंद राहील. याची नागरीकांनी नोंद घ्यावी तसेच पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान काही भागात दाेन दिवस कमी दाबाने पाणीपूरवठा हाेण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी ठाणे पालिकेस सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान दिवाळीच्या सणात पाणीपूरवठ्यावर परिणाम झाल्याने नागरिकांना त्रास हाेणार असल्याची चर्चा सुरु आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

mumbra
Sangli News : काय सांगता! कचरा डेपोवर सांगली महापालिकेने घेतली सभा, जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com