पुण्यातील 'या' भागात रविवारी पाणीपुरवठा नाही- PMC

पुणे महानगरपालिकेने (PMC) नुकतंच जाहीर केले आहे की 27 मार्च रोजी शहरातील काही भागात पाणीपुरवठा होणार नाही.
Pune Water Cut
Pune Water CutSaam TV
Published On

पुणे महानगरपालिकेने (PMC) नुकतंच जाहीर केले आहे की 27 मार्च रोजी शहरातील काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. कल्याणीनगर, वडगावशेरी, लोहेगाव, विमाननगर, विश्रांतवाडी आणि येरवडा या क्षेत्रात पाणी पुरवठा बंद असणार आहे. पीएमसीने जारी केलेल्या निवेदनानुसार, भामा आसखेड धरण परिसरात नियोजित विद्युत कामे करण्यासाठी पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

दरम्यान शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्र पंपींग, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र आणि नवीन व जुने होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत, पंपींग विषयक, स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जाणार असल्यानेगुरुवारी (दि.24) रोजीही पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. तसेच शुक्रवारी (दि.25) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली होती. (Pune News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com