किसमें कितना है दम! राणेंकडून प्रकाश महाजनांना धमकी, राणेंविरोधात महाजनांनी ठोकला शड्डू; नेमकं प्रकरण काय?

Narayan Rane-Prakash Mahajan Controversy : नितेश राणे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजप खासदार नारायण राणे यांनी महाजन यांना धमकीवजा इशारा दिलाय. ज्यानंतर राणे विरुद्ध महाजन हा वाद चांगलाय पेटलाय. मात्र राणे-महाजन यांच्यात वादाची ठिणगी कधी पडली.
Narayan Rane-Prakash Mahajan Controversy
Narayan Rane-Prakash Mahajan Controversy Saam Tv News
Published On

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

मुंबई : मनसे नेते प्रकाश महाजनांनी राणेंविरोधात शड्डू ठोकलाय. याला कारण ठरलयं. नितेश राणेंनी ठाकरे बंधूंवर केलेली खोचक टीका. याच टीकेनंतर प्रकाश महाजनांनी नितेश राणेंच्या वैचारिक उंचीवर भाष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. ज्यानंतर नितेश राणेंवरील टीका नारायण राणेंना खटकलं. नारायण राणेंनी फेसबुकच्या माध्यमातून महाजनांना धमकीवजा इशारा देणारी पोस्ट केली. ज्यानंतर राणे विरुद्ध महाजन असा शाब्दिक वाद पेटलाय. त्यात राणे समर्थकांकडूनही महाजन यांना धमकीचे फोन येऊ लागलेत.

राणे समर्थकांकडून येणाऱ्या धमकीनंतर महाजनांनी जीवाचं बरं वाईट झाल्यास राणे जबाबदार राहतील, असं म्हटलं. तर दुसरीकडे क्रांती मैदानात जाण्याचा इशारा देत महाजनांनी राणेंविरोधात दंड थोपटले.

Narayan Rane-Prakash Mahajan Controversy
NCP : पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट होणार? जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे पाटलांचे संकेत

दरम्यान संपलेल्या माणसांना संजीवनी द्यायची नाही अशा शब्दांत नारायण राणेंनी प्रकाश महाजनांना उत्तर दिलंय. त्यांच्यात काय दम आहे ते मी पाहिलंय,अशी खोचक टीकाही राणेंनी केलीय. दरम्यान राणे विरुद्ध महाजन वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाजनांची बाजू घेऊन राणेंना खडसावणार का? की कार्यकर्त्यांचा वाद म्हणून त्याकडे दुर्लेक्ष करणार. याबरोबरच वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद पेटत राहणार की थंड होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलयं.

Narayan Rane-Prakash Mahajan Controversy
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंविरोधात मोठा डाव; पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता फोडला, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com