Mumbai News: NIAची मुंबई, पुण्यात मोठी कारवाई; ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून चौघांना अटक

एनआयएने मुंबई आणि पुण्यातील पाच ठिकाणी छापे टाकले आहेत.
NIA Raid
NIA RaidSaam Tv
Published On: 

सचिन गाड

Mumbai News: एनआयएने मुंबई आणि पुण्यात मोठी कारवाई केली आहे. एनआयएने मुंबई आणि पुण्यातील पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. त्याचबरोबर एनआयएने ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून चौघांना अटक केली आहे. एनआयएने मुंबई, भिवंडी, पुणे या ठिकाणी छापे टाकले आहेत. (Latest Marathi News)

NIA ने 28 जून रोजी नागपाडा येथील एका रहिवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एनआयएला संशय आला की, त्यांच्या आणखी जण संपर्कात आहेत आणि त्यानुसार छापे टाकले. एनआयएने मुंबईतील दोन , भिवंडीतील पडघा येथे दोन आणि एक पुण्यात छापा टाकला आहे.

NIA Raid
Beed Crime News: बीड पुन्हा हादरलं! चार दिवसात जिल्ह्यात खुनाची तिसरी घटना, भरदिवसा व्यापाऱ्याला संपवलं

पुण्यात एनाआयए आणि आयबीची छापेमारी

दरम्यान, पुण्यात एनआयए आणि आयबीने छापेमारी मारली आहे. एनआयए आणि आयबीच्या पथकाची कोंढव्यात छापेमारी केली आहे. या कारवाईत एका ताब्यात घेतले आहे.

आज एनआयए आणि आयबीने संयुक्तरित्या पहाटे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटीमध्ये छापेमारी केली. त्यावेळी ३९ वर्षीय जुबेर शेख याला चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) व आयबी यांनी संयुक्तरित्या छापा मारून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून काही महत्वाचे कागदपत्र पुढील तपासाकरिता ताब्यात घेण्यात आले आहेत. सदर कारवाईवेळी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे

NIA Raid
Pune Crime News: पुण्यात कोयत्याची दहशत! कोयता विकण्यावरुन झाला वाद, पती-पत्नीने एकमेकांवर केले वार

कारवाईवेळी कोंढवा पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक संजय मोगले (गुन्हे), गोपनीय अंमलदार, तपास पथक स्टाफ,महिला पोलीस अंमलदार असे हजर होतो. सदर कारवाई शांततेत पार पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.