Mumbai News : होळी खेळून आल्यानंतर पती-पत्नी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले; दोघांचाही मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

Couple Death : गिझरमधून तयार झालेल्या विषारी वायूमुळे गुदमरून जोडप्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Mumbai News
Mumbai News Saam TV

मुंबई : होळीच्या दिवशी मुंबईत एक दुख:द घटना घडली आहे. होळी खेळून घरी परतलेल्या नवविवाहित जोडप्याचा बाथरुममध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गॅस गिझरमधून तयार झालेल्या विषारी वायूमुळे गुदमरून जोडप्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुंबईतील घाटकोपर येथे राहणारे दीपक शहा (40 वर्ष) आणि टीना शहा (35 वर्ष) यांचं काही दिवासांपूर्वीच लग्न झाले होते. घाटकोपर येथील कुकरेजा टॉवरमध्ये हे जोडपं भाड्याच्या घरात राहत होतं. याच टॉवरमध्ये त्यांचे काही नातेवाईकही राहत होते. होळीच्या दिवशी या जोडप्याने कॉलनीत सर्वांसोबत होळी खेळली. (Latest News Update)

Mumbai News
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, अवजड ट्रक पुलावरुन थेट खाली कोसळला

यानंतर दोघेही आंघोळीसाठी त्यांच्या घरी आले. बराच वेळानंतरही दोघे जेवायला न आल्याने नातेवाईक त्यांना बोलवण्यासाठी त्यांच्या फ्लॅटवर गेले. बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर दोघांच्याही मोबाईलवर नातेवाईकांनी कॉल केले. मात्र कुणीच कॉल उचलला नाही.

Mumbai News
Bus Accident : लक्झरी बस थेट ट्रेनला जाऊन धडकली; सहा जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

त्यानंतर नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी डुप्लिकेट चावीने फ्लॅट उघडला तेव्हा फ्लॅटच्या बाथरूममध्ये पती-पत्नी बेशुद्ध पडलेले आढळले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पंतनगर पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com