Bus Accident : लक्झरी बस थेट ट्रेनला जाऊन धडकली; सहा जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

ट्रेनमधील एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
Accident
Accident Saam TV

Accident News : नायजेरियात बस आणि ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. लागोस येथे हा अपघात झाला असून लागोस स्टेट इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने (LASEMA) ही माहिती दिली आहे.

नायजेरियाच्या नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीचे प्रमुख इब्राहिम फारिनलॉय यांनी सांगितले की, बस सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन जात असताना इंटरसिटी ट्रेनला धडकली. या अपघातात अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Accident News)

Accident
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, अवजड ट्रक पुलावरुन थेट खाली कोसळला

मृतांमधील सर्व बसमधील प्रवासी आहेत. ट्रेनमधील एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. प्राथमिक उपचारानंतर, जखमींना पुढील वैद्यकीय उपचारासाठी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

Accident
Accident News : मोठी बातमी! मुंबई- बेंगलोर हायवेवर शिवभक्तांच्या वाहनाचा अपघात; ३५ जण जखमी

बस चालकाचा निष्काळजीपणा

बस चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. बस ट्रेनला धडकण्यापूर्वी बस चालकाने ट्रेनचा ट्रॅफिक सिग्नल मोडण्याचा प्रयत्न केला. स्थानिक रहिवाशांच्या मते, नायजेरियन शहरांमध्ये ट्रेन आणि ट्रकचे अपघात सामान्य आहेत. येथे वाहतुकीचे नियम सहसा नीट पाळले जात नाहीत. रस्ते आणि अशा प्रकारच्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक कठोर उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत असं मत नागरिकांनी व्यक्त केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com