Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, अवजड ट्रक पुलावरुन थेट खाली कोसळला

Accident News: अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी आहे.
Accident News
Accident News Saam TV

अमर घटारे

Amravati News : समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका कमी होण्याचं नाव नाही. आज समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदुरजनाजवळ हा अपघात झाला आहे. महामार्गावरून ट्रक थेट पुलावरुन खाली कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक नागपूरहून मुंबईकडे जात होता. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळाताच पोलीस घटनास्थळी झाले आहेत. (Accident News)

Accident News
Accident News : मोठी बातमी! मुंबई- बेंगलोर हायवेवर शिवभक्तांच्या वाहनाचा अपघात; ३५ जण जखमी

शिवभक्तांच्या गाडीला अपघात

बेंगलोर-मुंबई हायवेवर शिवभक्तांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. कात्रज देहूरोड बायपासच्या ताथवडे येथे एका टेम्पोचा अपघात झाला आहे. कंटेनरने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यात अनेक शिवभक्त जखमी झालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com