New Year 2025 : नवे स्वप्न, नव्या अपेक्षांसह नव्या वर्षाचं आगमन; भारतासह जगभरात जल्लोषात नववर्षाचं स्वागत,VIDEO

New Year 2025 celebration : भारतासह जगभरात जल्लोषात नववर्षाचं स्वागत झालं. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी समुद्र किनारे गर्दीने फुलले होते. लोकांच्या गर्दीमुळे पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
new year celebration
New yearSaam tv
Published On

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देऊन नवे वर्ष २०२५ साठी तरुणांसोबत अबाल वृद्धांनी सेलिब्रेशन केलं. जगभरातील काही देशात नववर्षांचं स्वागताचा जल्लोष पाहायला मिळाला. भारतातही विविध ठिकाणी नववर्षाचं जल्लोषात स्वागत झालं. या नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरही मोठी गर्दी पाहायला मिळाली.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले होते. मुंबईतील विविध पब, डिस्को आणि क्लबमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी तरुणाई सोबतच अबाल वृद्ध देखील मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. अंधेरी पश्चिम भागात असलेल्या कंट्री क्लबमध्ये देखील फिल्मी कलाकारांच्या उपस्थितीत सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. इथे डिजेच्या तालावर तरुणाईची पावले थिरकताना पाहायला मिळत आहे.

new year celebration
First New Year Celebration: सर्वात आधी कोणत्या देशात नवीन वर्ष होतो साजरा, भारत कितव्या स्थानी?

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर चौपाटींसारख्या पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणावर जमा झाल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईचा प्रसिद्ध जुहू चौपाटीवर पोलिसांकडून मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

नववर्षाचे स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वरिष्ठांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. जुहू चौपाटीवर सर्वाधिक पर्यटक हे नववर्ष स्वागत करण्यासाठी जमा झाले आहेत. या ठिकाणी पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चौपाटीच्या प्रत्येक एन्ट्री पॉइंटवर तसेच रस्त्यावर आणि चौपाटीवर देखील मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते.

new year celebration
New Year Astrology Tips : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी परिधान करा पांढरे कपडे; लक्ष्मीची राहील विशेष कृपा
new year celebration
Happy New Year 2025 : नवीन वर्षाचे स्वागत करा बॉलीवूडचे 'हे' चित्रपट पाहून

दरम्यान, नव्या वर्षाचं स्वागतासाठी मंदिरामध्ये गर्दी पाहायला मिळाली. मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिरात देखील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळाली. नव्या वर्षाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला अनेक भाविक सुरुवात करत असतात. त्यामुळे भाविक सिद्धिविनायक मंदिरात येत असतात. त्यामुळे सिद्धिविनायक न्यासाकडून मंदिरामध्ये विशेष अशी व्यवस्था करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com