
Mumbai News: विशाखापट्टणम येथे राहणारा ३१ वर्षीय तरुण नैराश्य स्थितीमध्ये घराबाहेर पडला. विशाखापट्टणम ते गोवा असा प्रवास करत असताना अनावधानाने तो मुंबईत पोहोचला. मुंबईमध्ये त्याच्याकडील सर्व सामान चोरीला गेले. त्यानंतर तरुणाला तीन महिने मुंबईच्या रस्त्यांवर राहावे लागले. घरी जायच्या प्रयत्नात हा तरुण मुंबई विमानतळाच्या सुरक्षारक्षकांच्या नजरेस पडला. त्यांनी तरुणाला सुखरुपपणे घरी पोहोचवले.
'थागरमपुडी यशवंत' असे या तरुणाचे नाव आहे. तो मेकॅनिकल इंजिनीअर आहे. मागच्या चार दिवसांपासून यशवंत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात फिरत होता. त्याने विमानतळात प्रवेश करायचा प्रयत्न केला. त्यावेळेस तेथील सिक्युर वन कंपनीचे अधिकारी सागर राहिदु यांच्या नजरेत यशवंत पडला. सागर यांनी यशवंतशी संवाद साधला. बोलताना त्याने सागर यांना संपूर्ण स्थिती सांगितली. त्याने वडिलांचा मोबाईल नंबरही दिला. नंबरवर फोनवर कॉल करुन सागर यांनी यशवंतच्या घरच्यांशी संपर्क केला.
सागर राहिदु यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबात वाद झाल्याने यशवंत तीन महिन्यांपूर्वी नैराश्य अवस्थेमध्ये घरातून बाहेर पडला होता. सुरुवातीला विशाखापट्टणम ते गोवा असा प्रवास त्याने केला. मग तो मुंबईत पोहोचला. मुंबईमध्ये आल्यावर त्याचे सामान, पैसे, कपडे सर्वकाही चोरीला गेला. यशवंत तीन महिने जे मिळेल ते खात मुंबईच्या रस्त्यांवर राहिला. विमानतळात प्रवेश करताना त्याला आम्ही पकडले. अस्वच्छ कपडे, वाढलेली दाढी अशा घाणेरड्या अवस्थेत यशवंत होता.
यशवंतने घर सोडल्यानंतर लगेच त्याच्या वडिलांनी थागरमपुडी शिवाप्रसाद यांनी पोलिसांकडे आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. सागर राहिदु यांनी त्यांना फोन करुन सर्व प्रकार समजावला. पुढे सुरक्षारक्षकांनी मिळून यशवंतचे तिकीट काढले आणि त्याला विशाखापट्टणला विमानाने पाठवले. मुंबई विमानतळावरील सुरक्षारक्षकांमुळे हा तरुण तीन महिन्यांनी घरी परतू शकला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.