Walmik Karad : वाल्मीक कराडचं शरणनाट्य! ज्या आलीशान गाडीत आला ती नेमकी कुणाची?

Walmik Karad News: २१ दिवसानंतर वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला. त्यावेळी पाषाण येथील सीआयडी कार्यलयाबाहेर मोठा ड्रामा पाहायला मिळाला. वाल्मीक कराड सरेंडर होण्यासाठी ज्या गाडीत आला, ती गाडी कोणाची होती?
Walmik Karad
Walmik Karad Saam Tv
Published On

Beed Sarpanch Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील मास्टारमाईंड आणि खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड यानं आज पुण्यात पोलिसांसमोर सरेंडर केलं. वाल्मीक कराड याच्या सरेंडरवेळी पुण्यातील सीआयडी कार्यालयाबाहेर मोठा ड्रामा पाहायला मिळाला. तो स्कॉर्पियो गाडीमधून पाषाण येथील सीआयडी कार्यालयात दाखल झाला. ती गाडी नेमकी कोणाची होती? अशी चर्चा सुरू झाली. शिवलिंग मोराळे यांच्या गाडीमधून वाल्मीक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात दाखल झाले. शिवलिंग मोराळे हे वाल्मीक कराड यांचे निकटवर्ती मानले जातात.

वाल्मीक कराड ज्या आलीशान गाडीत आला ती नेमकी कुणाची?

आज दुपारी १२ वाजताच्या दरम्यान वाल्मीक कराड पुण्यातील पाषाण येथील सीआयडी कार्यलयात शरण आला. २१ दिवसांपासून फरार असणारा वाल्मीक कराड पुण्यातील कार्यलायात येताना मोराळे यांच्यासोबत आला. शिवलिंग मोराळे यांच्या MH 23 BG 2231 या क्रमांकाच्या स्कॉर्पिओमधूल वाल्मीक कराड पुण्यातील कार्यालयात आला. शिवलिंग मोराळे आणि वाल्मीक कराड यांचे जवळचे आणि व्यावहारिक संबंध असल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्यावेळी कराड सीआयडीमध्ये शरण गेला त्यावेळी मोराळे हे सोबत होते. शिवलिंग मोराळे हे औषधाची पिशवी घेऊन कराड यांना भेटण्यासाठी आतमध्ये आले होते.

Walmik Karad
Walmik Karad surrenders : वाल्मिक कराडच्या सरेंडरचे नाट्य, स्कॉर्पिओमधून लपून आला अन् पोलिसांनी पकडले, पाहा व्हिडीओ

महिंद्रा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या नव्याकोऱ्या स्कॉर्पिओ कारमधून वाल्मीक कराड हा पुण्यातील पाषण येथील सीआयडी मुख्यालयात दाखल झाला. MH 23 BG 2231 असा या कारचा क्रमांक आहे. सीआयडीनं ही कार ताब्यात घेतलेली आहे, ही कार शिवलिंग मोराळे यांची आहे. शिवलिंग मोराळे हा मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. शिवलिंग मोराळे यांचे सोशल मीडियावर मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो आहेत. वाल्मीक कराड हा माझ्या जवळच्या असल्याचं धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांसमोरच सांगितले होते. आज वाल्मीक कराड यानं शरण येण्यासाठी वापरलेली कारचं पासिंग बीडमध्ये करण्यात आलेलं आहे.

Walmik Karad
Walmik Karad Video : CID ला शरण येण्याआधी वाल्मीक कराड काय म्हणाला? व्हिडीओ बघा

वाल्मीक कराडला अटक?

वाल्मीक कराड याने सरेंडर केल्यानंतर त्याला अटक होणार का? अशी चर्चा सुरू झाली. मागील तीन तासांपासून सीआयडीने वाल्मीक कराड याची कसून चौकशी केली. या चौकशीनंतर सीआयडीने वाल्मीक कराड याला मेडीकल चेकअपसाठी रूग्णालयात नेलं आहे. त्यामुळे कराड याच्या अटकेची चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केज येथील खंडणी प्रकरणी वाल्मीक कराड यांना अटक होण्याची शक्यता आहे. अवदा कंपनीतील कर्मचाऱ्यास दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपी प्रकरणी वाल्मिक कराड यांना अटक होण्याची शक्यता आहे. काही वेळात खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड यांना अटक करुन आज सायंकाळपर्यंत केज येथील न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

Walmik Karad
Walmik karad : वाल्या, वाल्मिक आणि वाल्मिक अण्णा; मुंडेंचा घरगडी कसा झाला बीडचा बॉस? वाचा स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com