Walmik Karad Video : CID ला शरण येण्याआधी वाल्मीक कराड काय म्हणाला? व्हिडीओ बघा

Walmik Karad Surrender : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आपला काहीही सहभाग नसल्याचे कराडने सांगितले. पोलिसांना शरण जाण्याआधी कराडने एक व्हिडीओ पोस्ट केला, त्यामध्ये त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.
Walmik Karad Surrender News
Walmik Karad SurrenderSaam Tv
Published On

Walmik Karad Surrender News: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आलाय. २१ दिवसानंतर वाल्मीक कराड पोलिसांना शरण आलाय. वाल्मीक कराड यानं शरण येण्याआधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओत वाल्मिक कराड याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आपला काहीही सहभाग नसल्याचे कराडने सांगितले, त्याशिवाय आपल्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावाही त्याने केलाय.

केजच्या मस्साजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली. हे प्रकरण विधानसभेत तर गाजलेच, बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाही निघाला होता. प्रमुख सूत्रधाराला बेड्या ठोकाव्या, अशी मागणी करण्यासाठी बीडमध्ये मोर्चा निघाला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनाही आक्रमक भूमिका घेतली. हा तपास सीआयकडी देण्यात आला. त्याशिवाय आरोपींची बँक खाती फ्रीज करण्यात आली. अखेर २१ दिवसानंतर वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला. त्याआधी त्यानं एक व्हिडीओ पोस्ट केला.

Walmik Karad Surrender News
Walmik Karad surrenders : वाल्मिक कराडच्या सरेंडरचे नाट्य, स्कॉर्पिओमधून लपून आला अन् पोलिसांनी पकडले, पाहा व्हिडीओ

व्हिडीओत वाल्मिक कराड काय म्हणाला ?

वाल्मिक कराड याने स्वत: पुण्यात पोलिसांकडे सरेंडर केलं. तत्पूर्वी त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. खंडणी प्रकणाचा आणि माझा काही संबंध नाही. राजकीय द्वेषातून माझं नाव या प्रकरणात गोवलं जात आहे. संतोष देशमुख यांचे जे मारेकरी असतील त्यांना अटक करून फाशीची शिक्षा करण्यात यावी. जर मी या प्रकरणात दोषी आढळलो तर न्याय देवता मला जी शिक्षा देईल ती मला मान्य असेल.

Walmik Karad Surrender News
Walmik Karad surrender : मोठी बातमी! वाल्मीक कराड पोलिसांना शरण

खंडणीच्या आरोपात मी सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येत माझा काहीही सहभाग नाही. जर सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यास मला फासावर लटकवा, असे वाल्मीक कराड यांनी सरेंडर होण्याआधी म्हटले.

पुण्यातील पाषाण रोड येथील सीआयडी ऑफिसमध्ये मंगळवारी वाल्मिक कराड याने सरेंडर केलं. त्यावेळी पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. वाल्मीक कराड याचे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी परिसरात एकच गर्दी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Walmik Karad Surrender News
Walmik Karad: वाल्मीक कराड CID समोर शरण, संतोष देशमुखांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com