
Walmik Karad Surrendar: बीडच्या मस्साजोगमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणात संशयित आरोपी वाल्मीक कराडने आज (३१ डिसेंबर) दुपारी पुणे पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. मागील काही दिवसांपासून तो फरार होता. कराडच्या शोधासाठी सीआयडीने राज्यभरात पोलीस पथकं पाठवली होती. शोधमोहीम सुरु असतानाच वाल्मीक कराडने सरेंडर केले. हत्याप्रकरणाऐवजी खंडणी प्रकारात आत्मसमर्पण केल्याचे त्याने एका व्हिडीओमध्ये स्पष्ट केले. या प्रकारावर छत्रपती संभाजीराजे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी वाल्मीक कराड आत्मसमर्पणावर भाष्य केले आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे सीआयडीचं यश नसल्याचे म्हटले. ते म्हणाले, "संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी बीडमध्ये मोर्चा झाला. त्यातून सरकारवर आम्ही दबाव टाकला. यातून वाल्मीक कराडवर मानसिक दबाव आला आणि त्याने शरणागती पत्करली. यामध्ये सीआयडीचे यश नाही.
"११ दिवस आरोपी महाराष्ट्रभर बिनधास्तपणे फिरतो. अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतो, पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल होतो. २२ दिवसांनी तो कसाकाय सरेंडर झाला. काल धनंजय मुंडे फडणवीसांना भेटतात आणि आज वाल्मीक कराड पोलिसांसमोर हजर होतो. मुंडेंकडून कराडला काही निरोप आला का? हा संशोधनाचा भाग आहे", असे संभाजीराजे यांनी म्हटले.
"वाल्मीक कराड हा ७ आरोपींचा म्होरक्या आहे. त्याच्या नावावर १४ गुन्हे आहेत. असे असूनही तो बॉडीगार्ड घेऊन फिरतो. त्याच्यावर मोक्का लागणं गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांना वाल्मीक कराडवर मोक्का लावण्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे. त्याला मोक्का लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही", असे म्हणत संभाजीराजे यांनी वाल्मीक कराडवर कारवाई करण्याची मागणी केली.
त्याशिवाय संभाजीराजे यांनी "धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद मुळीच देऊ नका, अशी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे. अजित पवार याविषयी एकदाही का बोलले नाहीत असा माझा उपमुख्यमंत्री पवार यांना सवाल आहे. काल चर्चा झाल्यानंतर आज लगेच वाल्मीक कराड शरणागतीला कसा आला," असे वक्तव्य देखील केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.