
मुंबई ते बदलापूर प्रवास आता सुसाट होणार आहे. मुंबई ते बदलापूर हे अंतर खूप जास्त आहे. रेल्वे हा एकच पर्याय आहे. या प्रवासासाठी जास्त वेळ जातो. आता मुंबई आणि बदलापूरला मेट्रोने जोडले जाणार आहे. मुंबई बदलापूरला मेट्रोने जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मार्गिका प्रस्तावित केली आहे. (Badlapur Metro)
एमएमआरडीएने कांजुरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिकेसाठी प्रस्ताव दिला आहे. ही मार्गिका ३८ किमीची असणार आगे. मेट्रो १४ मार्गिकेच्या पर्यावरणीय अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
या सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. या मार्गिकेची सर्व कार्यवाही पूर्ण करुन पुढच्या वर्षभरात मेट्रो १४ मार्गिकेच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बदलापुरकरांना मेट्रोने प्रवास करायचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मुंबई ते बदलापूर मेट्रो झाल्यावर हा प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार आहे. या मार्गिकेचे काम मार्गी लावण्यासाठी काही पाऊले उचलण्यात आली आहे. या मार्गिकेसाठी मिलान मेट्रो कंपनीने प्रकल्पाचा अहवाल तयार केला आहे. याला आयआयटी मुंबईने मान्यतादेखील दिली आहे. आता फक्त अंतिम मंजुरी मिळायची बाकी आहे. यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
राज्य सरकारने मान्यता दिल्यावर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. ही नवीन मेट्रोल ठाणे खाडी, पारसिक हिल, फ्लेमिंगो अभयारण्य या ठिकाणावरुन जाणार आहे. त्यामुळे पर्यावरण अहवाल सादर करणे आणि वनविभागाची परवानगी घेणे महत्त्वाचे असणार आहे.
कांजुरमार्ग ते बदलापूर ही मेट्रो मार्गिका ३९ किमी लांबीची असणार आहे. यात १५ स्थानके असणार आहे. कांजुरमार्ग ते घणसोलीदरम्यान भुयारी मार्गिका असणार आहे.यासाठी अपेक्षित खर्च १८ गजार कोटी रुपये असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.