Badlapur News: बदलापूर पालिकेची थकीत करवसुलीसाठी धडक मोहीम, 121 मालमत्तांवर जप्तीची कारवाई

Badlapur Municipal Corporation: बदलापूर नगरपालिकेने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी एक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
Badlapur Municipal Corporation
Badlapur Municipal Corporationgoogle
Published On

मयूरेश कडव/साम टीव्ही न्यूज

बदलापूर नगरपालिकेने थकीत मालमत्ता कराची वसुली सुलभ आणि प्रभावीपणे करण्यासाठी एक धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत १२१ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून, पालिकेने थकबाकीदारांची नावे सार्वजनिकपणे बॅनर्सद्वारे शहरभर प्रसिद्ध केली आहेत. यामुळे वसूलीत चांगली गती मिळाल्याचा विश्वास मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

बदलापूर पालिकेकडे मागील थकबाकी आणि चालू वर्षाची मागणी यासह एकूण ८२ कोटी रुपये मालमत्ता कराची वसूली अपेक्षित आहे. यापैकी आत्तापर्यंत ६२ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत आणि ३१ मार्चपर्यंत उर्वरित २० कोटी रुपये वसूल करणे हे पालिकेचे लक्ष्य आहे. पालिकेच्या कर वसुली अभियानामुळे अनेक व्यावसायिक मालमत्ताधारकांनी त्यांच्या थकीत कराची वसूली सुरू केली आहे.

Badlapur Municipal Corporation
Satbara Utara : महसूल विभागाचा मोठा उपक्रम! 'सातबारा' संदर्भात घेतला महत्त्वाचा निर्णय

मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी ५ पथकं तयार केली आहेत, जी प्रत्येक पथकाने ठरवलेल्या क्षेत्रांमध्ये जाऊन थकबाकीदारांवर कारवाई करत आहेत. या पथकांनी १२१ मालमत्तांवर सील लावले असून, थकबाकीदारांची नावे असलेले बॅनर्स सर्वत्र लावले आहेत. या बॅनर्समुळे अनेक थकबाकीदार जागचेच थकीत कर भरून देत आहेत.

Badlapur Municipal Corporation
Nanded Crime: शाळेतील मुलीचा पाठलाग, विक्षिप्त हातवारे करत छेड, पोलिसांनी नराधमाला घडवली अद्दल

जप्तीची कारवाई सुरू झाल्यावर थकबाकीदारांनी पालिकेच्या पथकांना जागेवरच चेक दिले आहेत. त्यानुसार, यंदा बदलापूर नगरपालिकेला विक्रमी मालमत्ता कर वसूल होण्याची शक्यता आहे. या अभियानामुळे पालिकेच्या कर वसुलीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल आणि शहरात एक प्रभावी आर्थिक वातावरण तयार होईल.

Badlapur Municipal Corporation
कोयते, कुऱ्हाडी, मिरचीची पूड घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत, पोलिसांनी दहा जणांच्या मुसक्या आवळल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com