Koregaon-Bhima: कोरेगाव-भीमा लढाईवरुन नवा वाद; ब्राम्हण महासंघ, दलित संघटना आमने-सामने (पहा Video)

या पुस्तकावरती बंदीची मागणी अनाठायी असून लोकांसमोर खरा इतिहास येऊ द्या तसंच बंदी आणली तर मोफत पुस्तके वाटली जातील असा इशारा ब्राम्हण महासंघाच्या आनंद दवे यांनी दिला आहे.
Koregaon-Bhima: कोरेगाव-भीमा लढाईवरुन नवा वाद; ब्राम्हण महासंघ, दलित संघटना आमने-सामने (पहा Video)
Koregaon-Bhima: कोरेगाव-भीमा लढाईवरुन नवा वाद; ब्राम्हण महासंघ, दलित संघटना आमने-सामने (पहा Video)Saam TV
Published On

पुणे : कोरेगाव-भीमा लढाईच्या वादाला (Battle of Koregaon-Bhima) नव्याने तोंड फुटलं असून जयस्तंभाची जबाबदारी सांभाळणाऱ्या माळवदकर कुटुंबीयांचे सातवे वंशज असलेले अॅड. रोहन माळवदकर (Adv. Rohan Malwadkar) यांनी '1 जानेवारी 1818 कोरेगाव-भीमा लढाई वास्तव' हे नवं पुस्तक लिहिलं आहे. याच पुस्तकावरुन दलित संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली रोहन माळवदकर यांनी लिहलेल्या पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे.

ते म्हणाले, कोरेगाव-भीमा (Koregaon Bhima) येथे लढाई झालीच नाही चकमक झाली असा चुकीचा इतिहास सांगून रोहन माळवदकर यांनी वास्तव पुस्तक लिहले आहे. कोरेगाव-भीमा हा प्रश्न बहुजन समाजासाठी अभिमानाचा आणि आपुलकीचा आहे. चुकीचा इतिहास सांगितल्यामुळे समाजात महाराष्ट्र राज्यात समाजासमाजात तेढ निर्माण होऊन शांतता भंग होऊ शकते या पुस्तकामुळे समाजात अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

पहा व्हिडीओ -

त्यामुळे वास्तव या पुस्तकावर महाराष्ट्र सरकारने त्वरित बंदी घालावी अशी मागणी खरात करत आहेत. मात्र दुसरीकडे यांनी '1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाई वास्तव' या पुस्तकावरती बंदीची मागणी अनाठायी असून लोकांसमोर खरा इतिहास येऊ द्या तसंच बंदी आणली तर मोफत पुस्तके वाटली जातील असा इशारा ब्राम्हण महासंघाच्या आनंद दवे (Anand Dave of Brahmin Federation) यांनी दिला आहे.

रोहन माळवदकर लिखित कोरेगाव-भीमा लढाईचे वास्तव या खऱ्या पुराव्यावर आधारित पुस्तकाचे आम्ही प्रकाशन केले आणि त्यावर दलित संघटनानी बंदी ची मागणी केली आहे. ती लढाई ही पेशवा आणि अन्य कोणता समाज अशी नव्हती तर हिंदवी साम्राज्याचे सैन्य आणि परकीय सैन्य अशीच होती ही भूमिका आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मांडत आहोत.

Koregaon-Bhima: कोरेगाव-भीमा लढाईवरुन नवा वाद; ब्राम्हण महासंघ, दलित संघटना आमने-सामने (पहा Video)
धक्कादायक! आर्थिक विवंचनेतून सोलापुरात ST कर्मचाऱ्याच्या मुलाची आत्महत्या!

या पुस्तकाच्या अनुषंगाने त्याला पुरावे दिले गेले आहेत आणि आमच्या भूमिकेला आपोआपच अनुमोदन सुद्धा मिळाले आहे. जर इतर कोणत्याही संघटना या लिखाणाला मान्य करीत नसतील तर त्यांनी त्यांचे पुरावे मांडावे. परंतु असं न करता जर बंदीची मागणी होत असेल तर ब्राह्मण महासंघ याला न केवळ तीव्र विरोध करील तर त्या पुस्तकांचे (Book) मोफत वाटप पण करेल असं आनंद दवे यांनी सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com