Bogus Doctors : मुंबई, नाशिक आणि भिवंडीत बोगस डॉक्टरांचं जाळं, उपचाराच्या नावाखाली रुग्णाकडून उकाळले 14 लाख रुपये
>> संजय गडदे
Fake Ayurvedic Doctor :
मुंबईकरांनो तुम्ही जर युनानी आयुर्वेदिक डॉक्टरकडून उपचार घेत असाल तर त्याची अगोदर त्यांची डिग्री तपासा, कारण अनेक दिवसांपासून नाशिक, मालेगाव, भिवंडी आणि मुंबईत अनेक बोगस युनानी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात तक्रार आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट तीनने कारवाई करत चार बोगस डॉक्टरांना अटक केली असून त्यांच्याकडून नऊ मोबाईल एक कार आणि 14 लाख रुपये कॅश हस्तगत केले आहेत.
मोहम्मद शेरू शेख मकसूद खान उर्फ डॉ.आर पटेल (49 वर्षे), मोहम्मद नफीस मोह शरीफ (39 वर्षे), मोहम्मद नफीस मोह निसार (27 वर्षे) आणि मोहम्मद आशिफ मोह शरीफ (44 वर्षे) अशी करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक तज्ञ डॉक्टरांनाही दाखवून गुडघेदुखी, कंबर दुखी, पाठदुखी सोबतच इतर जुनाट व्याधींवर उपचार करण्याचा दावा करत रुग्णांना शंभर टक्के बरा करण्याचे या युनानी आयुर्वेदिक डॉक्टर कडून पीडित व्यक्तीला सांगितले जायचे. या डॉक्टरांच्या टोळीकडून गार्डन, मैदान आणि जॉगिंग पार्क परिसरात, असे रुग्ण हेरून कोणताही आजार बरा करण्याचा दावा केला जात असे. त्यांच्या या थापाना आजाराने त्रस्त झालेले रुग्ण भूलत असे. (Latest Marathi News)
आत्तापर्यंत या टोळक्याने मुंबईत 100 पेक्षा अधिक रुग्णांना आपली शिकार बनवली असून त्यांच्याकडून लाखो रुपये उपचाराच्या नावाखाली उकळले आहेत. मात्र पैसे घेऊन ही रुग्णांना कसलाही आराम मिळाला नसल्यामुळे यातील एक रुग्णाने या संदर्भात मरीन लाईन पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच युनिट तीनने या बोगस डॉक्टर टोळीला मालेगाव परिसरातून अटक केली आहे. शिवाय यांची अजून काही साथीदार फरार देखील असल्याचे तपासातून पुढे आले आहे.
फिर्यादी यांचे वडाळा येथील घरी येऊन, त्यांची तपासणी करुन पित्तामुळे त्यांच्या शरीरातील नसा दबल्याचे सांगून, त्यामुळेच फिर्यादी यांचे दोन्ही हात थरथरत असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही बाजूस छिद्र असलेली मेटल तुंबडी फिर्यादी यांच्या शरीरावरील गाठीवर शरीरातील सर्व पित्त शरीराबाहेर काढल्याचे रुग्णाला दाखवून बसवत असे. या बनावट उपचाराकरीता फिर्यादी यांचेकडून 14 लाख रुपये उकळण्यात आले
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.