

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आलीये. विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होईल, तर एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. विधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसलाही एक जागा जिंकण्याची संधी आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ जणांची नावे चर्चेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या जागेसाठी पिंपरी-चिंचवड शहरातून चार जणांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाचे विधानसभेवर दोन आमदार आहेत. तर विधानपरिषदेवर दोन आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त एकच आमदार विधानसभेत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेवर एक आमदार जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये भोसरी विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भोसरी विधानसभा निवडणूक लढवणारे नगरसेवक अजित गव्हाणे यांची नावे चर्चेत आहे.
तसेच चिंचवड विधानसभा निवडणूक लढवणारे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे हे चार जणांपैकी एकाची विधानपरिषदेवर आमदार या पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यात विलास लांडे आणि योगेश बहल यांच्या नावामध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.