Sharad Pawar Group Protest: कोट्यवधी लाभार्थी असलेल्या 'आयुष्मान भारत' योजनेविरोधात शरद पवार गटाचं आंदोलन, काय आहे कारण?

Protest Against PM Ayushman Yojana: नागरिकांच्या हितासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत कार्ड योजना सुरू केली आहे. ही योजना सपशेल फेल, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलं आहे.
Sharad Pawar Group Protest
Sharad Pawar Group ProtestSaam Tv
Published On

अक्षय बडवे

NCP Sharad Pawar Group Protest In Pune

आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशभरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांना(PM Ayushman Yojana) मोफत उपचार दिले जात आहेत. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे. परंतु या योजनेविरोधात पु्ण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक (NCP Protest) झाला आहे. पंतप्रधानांच्या आयुष्मान योजनेविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आंदोलन केलं आहे. (Latest Marathi News)

आयुष्मान भारत कार्ड सपशेल फेल असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केला आहे. आयुष्मान कार्ड असून देखील गोरगरिबांना उपचार मिळत (Sharad Pawar Group Protest In Pune) नाहीत. केंद्र सरकारची भूमिका फसवी म्हणत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून (NCP Sharad Pawar Group) निषेध आंदोलन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यात शरद पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आयुष्मान भारत कार्ड योजना काय आहे?

केंद्र सरकारने 23 सप्टेंबर, 2018 रोजी आयुष्मान भारत योजना सुरू केली ( What Is PM Ayushman Yojana) आहे. या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येतात. किरकोळ उपचारापासून शस्त्रक्रियेचा लाभ या योजनेत मिळतो. सरकारी आणि खासगी रुग्णालयात लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील 15 दिवसांपर्यंत सरकार खर्च करते.

ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. या योजनेअंतर्गत 12 कोटींहून अधिक कुटुंबांना दरवर्षी प्रति कुटुंब 5 लाख रुपयांचे संरक्षण मिळते. शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सरकारी नोकरी असेल तर या योजनेचा लाभ मिळत नाही. जर लाभार्थ्याचे उत्पन्न दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर या योजनेचा लाभ मिळत नाही.

Sharad Pawar Group Protest
Farmers Protest: शेतकऱ्यांनी आखली नवी रणनिती, येत्या ६ मार्चला रेल्वे मार्ग रोखणार; केंद्र सरकारचं टेन्शन वाढणार

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

  • आधार कार्ड

  • रेशन कार्ड

  • इनकम सर्टिफिकेट

  • मोबाइल क्रमांक

  • पासपोर्ट साईज फोटो

आयुष्मान भारत योजनेत नोंदणीसाठी अर्ज कसा करावा ?

  • पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम लोकसेवा केंद्र (CSC) वर जा.

  • तुमच्या सर्व मूळ कागदपत्रांच्या मूळप्रती तेथे सबमिट करा.

  • यानंतर, लोकसेवा केंद्र (CSC) चा एजंट सर्व कागदपत्रांची पडताळणी करेल.

  • योजनेअंतर्गत लोकसेवा केंद्र नोंदणी सुनिश्चित करेल. त्यानंतर तुम्हाला नोंदणी प्रदान करेल.

  • नोंदणी प्रदान केल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी लोकसेवा केंद्राद्वारे आयुष्मान भारतचं गोल्डन कार्ड प्रदान केलं जाईल.

  • यानंतर तुमची नोंदणी यशस्वी होईल.

Sharad Pawar Group Protest
Stree Shakti Yojana: महिलांना व्यवसायात आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारची जबरदस्त योजना, मिळणार २५ लाखांचं कर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com