सचिन गाड
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे. ईडी चौकशीविरोधात शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे. चौकशीचा निषेध म्हणून आज प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे नेते तसेच पदाधिकारी उपोषण करणार आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात राष्ट्रवादी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांबाहेर घंटानाद आंदोलन करणार आहे.
रोहित पवारांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांतर्फे 'वारसा विचारांचा, मार्ग संघर्षाचा', लडेंगे और जितेंगे अशा आशयाचे बॅनर लावत रोहित पवारांना बळ देण्यात येत आहे.
ईडी चौकशीचा निषेध म्हणून राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी पंढरपुरात देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ विठ्ठल मंदिरासमोर संत नामदेव पायरीजवळ महाआरती केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तर भाजप सरकारचा निषेध केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.