NCP Mla Meeting: आमदार अजित पवारांची साथ सोडणार? भर बैठकीत आमदारांनी स्पष्टचं सांगितलं

Mla Show Support To Ajit Pawar: अजित पवार गटाच्या आमदारांची आज बैठकी पर पडली. या बैठकीत शरद पवार गटात जाणाऱ्या आमदारांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीत आमदारांनी साथ न सोडण्याची शपथ घेण्यात आली.
NCP Mla Meeting: आमदार अजित पवारांची साथ सोडणार? भर बैठकीत आमदारांनी स्पष्टचं सांगितलं
NCP Meeting For Rajysabha ElectionSaam TV

रुपाली बडवे, साम प्रतिनिधी

आमदार सोडून जाणार असल्याच्या चर्चांमुळे चिंतेत आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलासा देणारी बातमी आमदारांच्या बैठकीत मिळाली. पराभव आला तरी आपण अजित पवारांची साथ सोडणार नसल्याची ग्वाही आमदारांनी दिलीय. आमदाराच्या ग्वाहीने अजित पवार गटावरील पक्ष फुटीचं संकट टळलंय. दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर अजित पवार गटात कमालीची अस्वस्थता निर्माण झालीय. अस्वस्थ झालेले आमदार दादांची साथ सोडणार असून ते शरद पवार गटात जाणार असल्याचा शक्यता वर्तवली जात आहे. या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. भाजप आणि महायुतीतील पक्षांनी ४५ प्लस जागा जिंकू असा दावा केला होता. परंतु राज्यातील जनतेने त्यांच्या खात्यात अवघ्या १७ जागा दिल्या. लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक फटका अजित पवार गटाला फटका बसला. महायुतीमधील समन्वय नसल्याने आणि जागा वाटपाबाबत झालेल्या दिरंगाईमुळे पक्षाला फटका बसल्याच म्हणत १० आमदार दादांची साथ सोडणार असल्याचं म्हटलं जात होतं.

अजित पवार गटातील नाराज आमदारांनी सुप्रिया सुळे यांना संपर्क केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. यासंदर्भातील वृत्त माध्यमातही आले होते. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने आज आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत चार आमदारांनी दांडी मारल्याने आमदार सोडून जाण्याच्या चर्चांना वाव मिळू लागला. मात्र त्याच दरम्यान बैठकीला गैरहजर राहणाऱ्या आमदारांनी बैठकीला गैरहजर राहण्यावरुन स्पष्टीकरण दिलं.

दरम्यान आज देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत आमदारांनी शपथ घेत आपण अजित दादाची साथ सोडणार नसल्याची ग्वाही दिली. तसेच कोणताच आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात नसल्याची ग्वाहीही आमदारांनी यावेळी दिली. यामुळे पक्ष फुटीचं अजित पवारांचं टेन्शन मिटलं आहे. अजित पवाराचं गटाला मोठा बंड होणार असल्याची चर्चा चालू असताना ही बातमी समोर आलीय. पराभव आला तरी आपण अजित पवार यांची साथ सोडणार नसल्याची ग्वाही सर्व आमदारांनी शपथ घेऊन दिली.

NCP Mla Meeting: आमदार अजित पवारांची साथ सोडणार? भर बैठकीत आमदारांनी स्पष्टचं सांगितलं
Ajit Pawar Group : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार गटाचं चिंतन; बैठकीत कोणत्या मुद्द्यावर झाली चर्चा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com