Ajit Pawar: निकाल काहीही लागो, आमचा विठ्ठल एकच; पराभवानंतर बारामतीत अजित पवार समर्थकांची बॅनरबाजी

Ajit Pawar Supporter Banner In Baramati: पराभवानंतर बारामतीत अजित पवार समर्थकांची बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. निकाल काहीही असला, तरी आमचा विठ्ठ्ल एकच असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे.
अजित पवार समर्थकांची बॅनरबाजी
Ajit PawarSaam Tv
Published On

मंगेश कचरे, साम टीव्ही बारामती

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर आता बारामतीत कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले आहेत. 'निकाल काहीही लागो, आमचा विठ्ठल एकच अजितदादा' अशा आशयाचा बॅनर बारामतीत लागल्याने मोठी चर्चा रंगली आहे.

निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर बारामतीत (Baramati) बॅनर लागले आहेत. या बॅनरवर सुरवात तुमच्यापासून आणि शेवटही तुमच्या सोबतच, असा उल्लेख करण्यात आला आहे. हे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विशाल जाधव यांनी लावले असल्याची माहिती मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवारांचे कार्यकर्ते अजित (Ajit Pawar) पवारांच्या समर्थनार्थ पुढे आल्याचं दिसत आहेत.

बारामतीतील अजित पवारांचे कार्यकर्ते विशाल जाधव यांनी 'निकाल काही लागो आमचा विठ्ठल एकच अजित दादा' अशा आशयाचा फलक लावला आहे. त्यांनी अजित पवारांना सहानभूती देण्याचा प्रयत्न केला (Maharashtra Politics) आहे. बारामती शहरातल्या देसाई स्टेट भागात हा बॅनर लावण्यात आला आहे. समर्थक पराभवानंतर अजित पवारांना सहानभूती देताना दिसत आहे. समर्थक पराभवानंतरही अजित पवारांच्या सोबत असल्याचं दिसत आहे.

अजित पवार समर्थकांची बॅनरबाजी
Ajit Pawar vs Anjali Damania : पुणे अपघात प्रकरणावरून राजकारण तापलं; अंजली दमानियांनीही अजित पवारांचं आव्हान स्वीकारलं

बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाच्या सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे. सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळेंना आघाडी मिळाल्याचं दिसलं. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला आहे, त्यामुळे अजित पवार गटात नाराजीचं चित्र आहे, तर कार्यकर्ते आधार देताना दिसत आहेत.

अजित पवार समर्थकांची बॅनरबाजी
NCP News Today: Ajit Pawar गटातील 10 आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतण्याची शक्यता? मोठी राजकीय Update समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com