

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान अजित पवारांनी काल मंत्रिमंडळ बैठकील दांडी मारल्याने या चर्चांना आणखी ऊत आला आहे. राज्यातील या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीदरम्यान राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षांचं ट्वीट चर्चेत आलं आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजित पवारांना पुन्हा परत येण्याची साद घातली आहे. प्रशांत जगताप यांनी ट्वीट करत म्हटलं की, लांडग्यांच्या युतीत जाऊन वाघाला समाधान लाभत नाही, तो अस्वस्थच असतो. (Latest Marathi News)
पोटाची खळगी भरते पण रुबाब आणि आदर जातो. लांडग्याच्या कळपातून बाहेर पडून पुन्हा जंगलाचा राजा होण्याची संधी वाघाकडे कायम असते, अशा आशयाचे ट्वीट करत प्रशांत जगताप यांनी अजित पवारांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. (Political News)
अजित पवार पालकमंत्रिपद आणि रडखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन नाराज असल्याची चर्चा आहे. येत्या ७ दिवसांत पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवा, असा अल्टिमेटम अजित पवार गटाने महायुतीला दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अजित पवार यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला गेल्याची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.