नवरात्रीत मुंबई लोकलमध्ये रंगला गरबा; लोकल ट्रेनमधील महिलांच्या गरब्याची सोशल मीडियावर चर्चा, पाहा व्हिडिओ

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांनी एकत्र येत गरब्याचा ठेका धरला असून, त्यांच्या या जल्लोषाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
Garba celebrations in Mumbai local trains during Navratri
Garba celebrations in Mumbai local trains during NavratriSAAM TV
Published On: 

सध्या देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. देवीच्या स्वागतासाठी सर्वत्र दांडिया आणि गरब्याची धूम पाहायला मिळत आहे. यादरम्यान, मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून नवरात्रीचा एक अत्यंत सुंदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुंबईकरांचा प्रत्येक सण साजरा करण्याचा जोश नेहमीच वेगळा असतो,आणि या व्हिडिओने पुन्हा एकदा ते सिद्ध केले आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, मुंबई लोकल ट्रेनच्या डब्यात काही महिलांनी एकत्र येत गरब्याचा आनंद लुटल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या सर्व महिलांनी नवरात्रीच्या रंगाशी सुसंगत अशा सुंदर लाल रंगाच्या साड्या आणि पारंपरिक पोशाख परिधान केला आहे. ट्रेनच्या डब्यात गाजणाऱ्या 'पावागड वाली माने दर्शन दे' या लोकप्रिय गुजराती भक्तीगीताच्या तालावर या महिलांनी धरलेला ठेका पाहण्यासारखा आहे.

Garba celebrations in Mumbai local trains during Navratri
Bladder cancer in dogs: 6 महिन्यांपासून लघवीतून रक्तस्राव, तपासणीत कॅन्सरचं निदान; डॉक्टरांकडून श्वानावर यशस्वी शस्त्रक्रिया

लोकल ट्रेनच्या गर्दीत आणि धावपळीच्या वातावरणातही सणाचा आनंद कसा साजरा करावा, याचे उत्तम उदाहरण या महिलांनी घालून दिले आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि एक्स यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहेत.

Garba celebrations in Mumbai local trains during Navratri
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

नवरात्रीच्या या नऊ दिवसांत मुंबईच्या लोकल ट्रेन असोत वा चाळी, प्रत्येक कोपऱ्यात देवीच्या भक्तीचा आणि संस्कृतीचा हा अनोखा उत्साह पाहायला मिळतोय, ज्याने उपनगरीय प्रवासाचा हा प्रवास अधिकच रंगतदार बनवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com