Water Cut : नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! मंगळवारी नळाला पाणी येणार नाही, कोणते भाग प्रभावित?

Navi Mumbai Water Cut : नवी मुंबईत मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत १० तासांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोलीसह खारघर आणि कामोठे परिसरावर परिणाम होणार आहे.
 water cut
water cutgoogle
Published On: 

Navi Mumbai Water Supply Latest News Update : नवी मुंबईकरांनो, मंगळवार आणि बुधवारी दोन दिवस पाण्याचा वापर जरा सांभाळून करावा. कारण महापालिकेच्या तांत्रिक कामांमुळे शहराचा पाणीपुरवठा तब्बल १० तास पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य साठा करून ठेवण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांत जलवाहिन्यांवर व्हॉल्व्ह बसवणे आणि फलोमीटर बसवण्याचे तांत्रिक काम हाती घेण्यात आले आहे. या आवश्यक कामांमुळे मंगळवार, दिनांक ०३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून संध्याकाळी ८:०० वाजेपर्यंत, म्हणजेच एकूण १० तासांच्या कालावधीसाठी मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

 water cut
२ आमदारांनी कमळ घेतलं हातात, पण अचानक घेतला यू-टर्न; म्हणाले भाजपमध्ये प्रवेश झालाच नाही, २४ तासांत नेमकं काय झालं?

या १० तासांच्या शटडाऊनमुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागामधील मंगळवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोडमधील पाणीपुरवठादेखील बंद राहणार आहे. तसेच, बुधवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

 water cut
१२ पैकी ११ आमदार फुटले अन् भाजपात प्रवेश; एकट्या पडलेल्या पक्षाध्यक्षांनी सोडलं मंत्रिपद; राजकारणात खळबळ

याशिवाय, दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार, दिनांक ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा जपून वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 water cut
NZ vs IND : अखेरच्या टी२० सामन्यात भारताचा पराभव, पण मालिका जिंकली, न्यूझीलंडचा शेवट गोड

कोणती कामं होणार?

सानपाडा येथील मोराज सर्कल जवळील मोर्बे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण जलवाहिनीवर ४०० मि.मी. व्यासाचे बटरफ्लाय व्वॉल्व्ह (Butterfly Valve) बसविण्याचे काम.

सानपाडा सेक्टर- ३० येथे सामना प्रेस जवळील मोर्बे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण जलवाहिनीवर २५० मि.मी. व्यासाचे स्लुईस व्वॉल्व्ह (Sluice Valve) बसविण्याचे काम.

वाशी सेक्टर-१९ येथील सतरा प्लाझा जवळील (ए.पी.एम.सी मार्केट) मोर्बे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण जलवाहिनीवर २५० मि.मी. व्यासाचे स्लुईस व्वॉल्व्ह (Sluice Valve) बसविण्याचे काम.

वाशी सेक्टर-२९ येथील मोर्बे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण जलवाहिनीवर ७०० मि.मी. व्यासाचे बटरफ्लाय व्वॉल्व्ह (Butterfly Valve) बसविण्याचे काम.

बेलापूर सेक्टर-२८ पंपहाऊस मधील पंपाना जोडणारे ७०० मि.मी. व्यासाचा Inlet चे बटरफ्लाय व्वॉल्व्ह (Butterfly Valve) बसविण्याचे काम.

बेलापूर सेक्टर-१५ किल्ला जंक्शन येथील मोर्बे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण जलवाहिनीवर १०० मि.मी. व्यासाचे बटरफ्लाय व्वॉल्व्ह (Butterfly Valve) बसविण्याचे काम.

शिरवणे गावाजवळील ८०० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण वाहिनीवर ४ फ्लोमीटर बसविणे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.