Navi Mumbai : नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, नाहीतर भरावा लागेल १ लाखांचा दंड; काय आहे महापालिकेचा निर्णय? वाचा

Navi Mumbai Water Crisis News : नवी मुंबईत वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
NAVI MUMBAI WATER CRISIS: NMMC ANNOUNCES RS 1 LAKH FINE FOR WATER WASTAGE, STRICT RESTRICTIONS IMPOSED
NAVI MUMBAI WATER CRISIS: NMMC ANNOUNCES RS 1 LAKH FINE FOR WATER WASTAGE, STRICT RESTRICTIONS IMPOSEDSaam Tv
Published On
Summary
  • नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

  • महापालिकेने पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कठोर निर्बंध लागू केले

  • पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांना २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत दंड

  • कंपन्यांच्या पुरवठ्यात २० टक्के कपात केली जाणार

एकीकडे राज्यात मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा असून दुसरीकडे पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. राज्यातील बहुतांश भागातील पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. अशातच नवी मुंबई महानगरपालिकेने पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आदेश जारी केला आहे. ज्या नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय होणार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या मागणीत वाढ होत असते. यंदा पावसाचे प्रमाण आणि जलसाठ्याची परिस्थिती लक्षात घेता भविष्यात उद्भवू शकणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी महापालिकेने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार शहरातील वॉशिंग सेंटर, कंपन्या आणि मोठ्या प्रमाणात पाणी वापरणाऱ्या घटकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

NAVI MUMBAI WATER CRISIS: NMMC ANNOUNCES RS 1 LAKH FINE FOR WATER WASTAGE, STRICT RESTRICTIONS IMPOSED
Monsoon Update : पावसाचा लेटमार्क! 'या' तारखेपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार; IMD चा नवीन अंदाज

महापालिकेच्या आदेशानुसार वॉशिंग सेंटरचे पाणी कनेक्शन तात्काळ बंद करण्यात येणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करताना कोणी आढळल्यास पहिल्या वेळी २५ हजार रुपये, दुसऱ्या वेळी ५० हजार रुपये आणि तिसऱ्या वेळी तब्बल १ लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. एवढेच नव्हे तर वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात पाणी वापरणाऱ्या कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात २० टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे.

NAVI MUMBAI WATER CRISIS: NMMC ANNOUNCES RS 1 LAKH FINE FOR WATER WASTAGE, STRICT RESTRICTIONS IMPOSED
Shocking: "मी ईश्वराचा अवतार..." म्हणत जाळ्यात ओढलं, IT कंपनीतील महिला मॅनेजरवर सलग २५ वर्ष अत्याचार

बांधकाम प्रकल्पांना देण्यात आलेले पाणी कनेक्शन बंद करून त्यांना केवळ प्रक्रिया केलेले म्हणजेच ट्रीटेड पाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे महापालिकेचे मत आहे. बाटलीबंद पाणी उत्पादन कंपन्या, एरेटेड वॉटर उद्योग तसेच स्विमिंग पूल यांना दिला जाणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, पाणीपुरवठा वाहिन्यांमधील गळती शोधून ती तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अवैध पाणी चोरीविरोधात विशेष मोहीम राबवून मिशन मोडमध्ये कारवाई केली जाणार आहे. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी पाणी जपून वापरणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com