

ASI पी. एन. पाटील यांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली
घटनास्थळी कथित सुसाईड नोट सापडल्याची प्राथमिक माहिती
मृत्यूपूर्वीचा कथित व्हिडिओही तपासाचा महत्त्वाचा भाग ठरू शकतो.
विकास मिरगणे, साम प्रतिनिधी
नवी मुंबईतील रबाळे परिसरात एका पोलीस अधिकाऱ्यांना जीवन संपवल्याची घनटा घडलीय. आत्महत्या करण्यापूर्वीचा ASI पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. आपल्या वडिलांची, मुलींची माफी मागत त्यांनी जीवन संपवलंय. ASI पी. एन. पाटील असं आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आहे. रबाळे परिसरातील एका लॉजमध्ये गळफास घेत अधिकाऱ्यानं जीवन संपवलंय. दरम्यान घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडालीय.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना कथित सुसाईड नोट सापडली असून यात काही पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामध्ये तत्कालीन DCP संजय कुमार पाटील, वायरलेस ACP गिरीष ठाकरे आणि आस्थापना विभागातील हेड कॉन्स्टेबल जयवंत आहीरे यांच्या नावांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या सुसाईड नोटमध्ये नेमके काय आरोप करण्यात आले आहेत. याबाबत अधिकृत तपासानंतरच स्पष्टता होणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनास्थळी मिळालेल्या कथित सुसाईड नोटमध्ये पी एम पाटील यांनी आपल्या मोबाईलमध्ये सुध्दा आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत. ऐरोली मधील लॅाजवर जावून फॅनला गळफास घेवून आत्महत्या करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.