मुंबई : जेट एयरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचं निधन झालं आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होत्या. अनिता यांनी आज गुरुवारी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. शेवटच्या काळात नरेश गोयल त्यांच्यासोबत होते.
मनी लॉड्रिंग प्रकरणात तुरुंगात असणारे नरेश गोयल यांना काही दिवसांपूर्वी सशर्त जामीन मंजूर झाला होता. पत्नी कॅन्सरशी झुंज देत असल्याचे सांगून कोर्टात जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. तसेच नरेश गोयल देखील कॅन्सरशी झुंज देत आहे.
नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांनी मुंबईतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अनिता गोलय यांच्या पश्चात त्यांचे पती, दोन मुले आहेत. नरेश गोयल यांनी आजारपणात पत्नी अनिता यांची काळजी घेण्यासाठी मानवतेच्या आधारावर जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांना सशर्त जामीन दिला होता.
नरेश आणि अनीता यांच्यावर दक्षिण मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. अनीता गोयल देखील एअरवेजच्या कामकाजात मदत करायच्या.
नरेश गोयल यांना ६ मे रोजी जेट एअरवेजचे संस्थापक मनी लाँड्रिंग प्रकरणा मुंबई उच्च न्यायालयात २ महिन्यांचा अंतरिम जामीन मिळाला होता. तसेच त्यांना मुंबईबाहेर न जाण्याच्या अटी घालण्यात आल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एनजे जामदार यांच्या एकल खंडपीठाने कॅनरा बँकेशी संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणी २ महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.