vishwas gangurde Death : माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन; वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Parvati Assembly former mla vishwas gangurde Death : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन झालं आहे.
vishwas gangurde Death
vishwas gangurde Death Saam tv

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन झालं आहे. विश्वास गांगुर्डे यांच्या पश्चात पत्नी, मुली आणि जावई असा परिवार आहे. आज दुपारी १२ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमी येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत.

पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचं आज गुरुवारी सकाळी निधन झालं. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते. संघात काम करत असताना त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्यांच्यावर गेल्या ७ दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, गांगुर्डे यांची आज सकाळी प्राणज्योत मालवली.

vishwas gangurde Death
Ghatkopar Hoarding Collapse: आरोपी भावेश भिंडेंच्या वार्षिक कमाईची माहिती आली समोर, पुणे महापालिकाही अलर्ट मोडवर

माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचं पार्थिव आज सकाळी त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांनी पुण्यात भाजपचे काम तळागाळापर्यंत नेण्याचं काम केलं. तसेच ते रुपी बँकेचे संचालक होते.

विश्वास गांगुर्डे यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स' पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, भाजपचे माजी शहराध्यक्ष, पर्वती मतदारसंघाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांचा भाजपचं काम तळागाळात नेण्यात मोठा वाटा होता. त्यांची कवी मन आणि सतत पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे नेते म्हणून ओळख होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com