संजय गडदे
Mumbai Crime News : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सहारगाव, अंधेरी पूर्व भागातून 2 आफ्रिकन तरुणांना अटक करुन ५५ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केला. ज्याची अंदाजे किंमत ११ लाख इतकी सांगितली जात आहे. अटक करण्यात आलेले हे दोन्हीही तरुण आफ्रिकन असून त्या दोघांचे वय 23 वर्ष आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मुंबई (Mumbai) शहरामधील शाळा, महाविदयालयीन परिसराजवळ अंमली पदार्थ विकणाऱ्या ड्रग पेडलर व विक्रेत्यांविरुदध कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी आदेश होते. त्यानुसार 1 फेब्रुवारीला गस्त करीत दोन अफ्रिकन वंशाचे तरुण सहारगाव, अंधेरी परिसरात संशयास्पदरित्या आढळून आले.
त्या दोघा तरुणांना अटकाव करुन त्यांची झडती घेतली असता त्या तरुणांकडून ५५ ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. ज्याची बाजारातील किंमत अंदाजे ११ लाख रुपये इतकी असल्याचे समजते.
या दोन्ही अफ्रिकन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना ड्रग्स बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.आरोपीकडे जप्त करण्यात आलेला हा अंमली पदार्थ कोणाकडून घेतला आणि नेमका कुणाला विकण्यासाठी आणला होता याबाबतचा अधिक तपास अमली पदार्थ विरोधी पथक कक्ष वांद्रे युनिट (Mumbai Police) करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.