Maharashtra Politics: मराठा आंदोलनावरून राजकारण पेटलं; नाना पटोलेंचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

Nana Potole Latest News: मनोज जरांगे यांना उपोषण करायला कुणी बसवलं होतं. त्यांच्यावर लाठीमार करण्याची कारणं काय? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
Nana Patole Devendra Fadnavis
Nana Patole Devendra FadnavisSaam TV
Published On

Nana Patole Vs Devendra Fadnavis

राज्यात एकीकडे मराठा आरक्षणावरून आंदोलन तापलं असताना दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी देखील सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. फसवणूक नको, आरक्षण द्या, असे फलक हाती घेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nana Patole Devendra Fadnavis
Breaking News: जालन्यात भल्यापहाटे पोलीस धडकले; मनोज जरांगेंचे कट्टर समर्थक ताब्यात, परिसरात मोठी खळबळ

यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनीच पोलिसांना दिले होते, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.  (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांना उपोषण करायला कुणी बसवलं होतं. त्यांच्यावर लाठीमार करण्याची कारणं काय? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील यांचं काय बोलणं झालं होतं. याचं उत्तर देणं ही मुख्यमंत्री शिंदेंची (Eknath Shinde) जबाबदारी असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

जेव्हा मराठा आंदोनावरून महाराष्ट्र पेटला असताना सरकार का गप्प होतं? असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणावरून मागासवर्गीय आयोगावर दबाव होता, अध्यक्षांसह सदस्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं गेलं, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, आम्हाला मनोज जरांगे यांच्याविषयी काहीही तक्रार नाही. ते त्यांच्या समाजाला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करीत आहेत. पण सरकारनेच मराठा आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर द्यावं, असंही पटोले म्हणाले.

Nana Patole Devendra Fadnavis
Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे अर्ध्या रस्त्यातूनच फिरले माघारी; मुंबईत न जाण्याचं सांगितलं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com