धक्कादायक! सख्ख्या मामानं भाचीला लोकलमधून ढकललं, ट्रॅकवर रक्ताच्या थारोळ्यात पडली

Teen Girl Pushed to Death from Running Local: १६ वर्षीय अल्पवयीन भाचीला सख्ख्या मामानेच धावत्या लोकलमधून ढकलून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नायगाव भाईंदरच्या रेल्वे ट्रॅकवर अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला.
Teen Girl Pushed to Death from Running Local
Teen Girl Pushed to Death from Running LocalSaam Tv Marathi
Published On
Summary
  • सोळा वर्षीय भाचीला मामाने ट्रेनमधून ढकललं

  • अल्पवयीन भाचीचा मृत्यू

  • नायगावमधील मामा भाची या नात्याला काळीमा फासणारी घटना

नायगावमधून मामा भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सोळा वर्षीय भाचीचा मामाने जीव घेतला आहे. धावत्या लोकलमधून त्यानं भाचीला ढकललं. या घटनेत तिचा दुर्देवी मृत्यू झाला. इतर प्रवाशांनी आरोपीला त्याचक्षणी पकडलं. तसेच पोलिसांच्या स्वाधीन केलं. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही धक्कादायक घटना नायगाव भाईंदरच्या रेल्वे स्टेशनदरम्यान उघडकीस आली. १५ नोव्हेंबरपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. तिच्या पालकांकडून अल्पवयीन मुलीचा शोध घेतला जात होता. १७ नोव्हेंबर रोजी अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन सोनी असे आरोपीचे नाव आहे.

Teen Girl Pushed to Death from Running Local
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला गळती, २ बड्या नेत्यांची भाजपमध्ये एन्ट्री

रेल्वे पोलिसांच्या तपासात महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. आरोपी मामा (वय वर्ष २०) हा अल्पवयीन मुलीसोबत चर्चगेट विरार लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात प्रवास करत होता. नायगावजवळ दोघेही दरवाज्याजवळ उभे असताना आरोपीनं अल्पवयीन मुलीला मागून ढकललं. धावत्या लोकलमधून पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Teen Girl Pushed to Death from Running Local
भेटायला बोलावून फिरायला नेलं, नंतर धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीच्या शरीराचे लचके तोडले

या संपूर्ण घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले प्रवासी विक्रम नंदू झा यांनी संपूर्ण घटना पाहून इतर प्रवाशांच्या मदतीने आरोपीला पकडले. तसेच पोलिसांच्या ताब्यात दिलं. सध्या आरोपीला वलिव पोलिसांनी अटक केली असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मामानं सख्ख्या भाचीला लोकलमधून खाली का ढकललं? याचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com