Municipal Elections: मुंबईमध्ये एकच मतदान, २८ महापालिकांमध्ये ३ ते ५ वेळा मतदान का? कारण काय?

Municipal Election 2026: २९ महापालिका निवडणुकांसाठी आज निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. मुंबईत एकच मतदान करता येणार तर उर्वरीत २८ महापालिकांमध्ये ३ ते ५ वेळा मतदान करता येणार आहे. यामागचे कारण काय? वाचा...
Municipal Elections: मुंबईमध्ये एकच मतदान, २८ महापालिकांमध्ये ३ ते ५ वेळा मतदान का? कारण काय?
Municipal Election 2026Saam tv
Published On

Summary:

  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकांच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या

  • राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत घोषणा केली

  • १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल लागणार आहे

  • मुंबईमध्ये एकच मतदान करता येईल तर २८ महापालिकांमध्ये ३ ते ५ वेळा मतदान करावे लागणार आहे

राज्य निवडणूक आयोगाने आज २९ महापालिका निवडणुकांची घोषणा केली. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये या निवडणुका होणार आहे. १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होईल आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी आजपासून आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्य प्रभाग असणार आहे. तर मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये चार सदस्य प्रभाग असणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महापालिका निवडणुकीसाठी आज कार्यक्रम जाहीर केला. त्यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्यीय प्रभाग असणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला फक्त १ मत द्यावे लागणार आहे. तर उर्वरीत २८ महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग असणार आहे. याठिकाणी एका प्रभागात ३ उमेदवार असतील. कुठे ४ तर काह ठिकाणी ५ उमेदवार असतील. त्यामुळे या २८ महापालिकांमध्ये मतदारांना साधारणपणे ३ ते ५ मतं द्यावे लागतील.'

Municipal Elections: मुंबईमध्ये एकच मतदान, २८ महापालिकांमध्ये ३ ते ५ वेळा मतदान का? कारण काय?
Mahanagarpalika Election: युतीची चर्चा झाल्यानंतर शिंदे खेळणार नवा डाव; जागावाटपावरून शिवसेना देणार भाजपला चेकमेट

२९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देश पत्र स्वीकारण्याचा कालावधी २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ असा असणार आहे. या नामनिर्देशन पत्राची छाननी ३१ डिसेंबर २०२५ ला होईल. तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत २ जानेवारी २०२६ असणार आहे. निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होईल. त्यानंतर १५ जानेवारी २०२५ रोजी मतदान होईल. तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल.

Municipal Elections: मुंबईमध्ये एकच मतदान, २८ महापालिकांमध्ये ३ ते ५ वेळा मतदान का? कारण काय?
Municipal Elections : २९ महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात, घोषणा कधी होणार? महत्त्वाची अपडेट

कोणत्या महापालिकेत किती प्रभाग?

मुंबई - २२७ प्रभाग

पुणे - १६२ नगरसेवक

पिंपरी-चिंचवड - १२८ नगरसेवक

ठाणे- ४८ प्रभाग

कल्याण- डोंबिवली - १२९ प्रभाग

नवी मुंबई - १११ प्रभाग

वसई विरार- ११५ नगरसेवक

नाशिक - १२२ प्रभाग

नागपूर - ५२ प्रभाग

छत्रपती संभाजीनगर - ११३ प्रभाग्

Municipal Elections: मुंबईमध्ये एकच मतदान, २८ महापालिकांमध्ये ३ ते ५ वेळा मतदान का? कारण काय?
Maharashtra Mahanagarpalika Elections : कार्यकर्त्यांनो लागा कामाला! २९ महापालिकांचा निवडणूक निकाल १६ जानेवारीला, वाचा संपूर्ण वेळापत्रक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com