Mahayuti Clash: ठाणे-केडीएमसीत महायुती धुसफूस? भाजप-शिंदेंची युती तुटणार?

Maharashtra Politics: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेसेनेची युती तुटणार असल्याचे संकेत खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिलेत. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद नेमका कसा चव्हाट्यावर आला आहे? ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत भाजपनं नेमकी काय रणनीती आखतयं. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Maharashtra Politics:
Political tension rises in Thane–KDMC as BJP–Shinde Sena alliance faces uncertainty.saam tv
Published On
Summary
  • कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यात भाजप विरुद्ध शिंदेसेना संघर्ष

  • रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे युती तुटण्याची चर्चा होतेय.

  • आगामी महापालिका निवडणुकीवर या वादाचा मोठा परिणाम होऊ शकतो.

राज्यात आधीच एकमेंकांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडण्यावरून भाजप आणि शिंदेसेनेत तणाव निर्माण झालाय. नगरपरिषदांसाठी काही ठिकाणी महायुतीतील मित्रपक्षांनी विरोधकांशी हातमिळवणी केलीय. अशातच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदेसेनेची युती तुटण्याचीच शक्यता आहे. त्याचं कारम ठरलंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना केलेलं आवाहन.

चव्हाण यांच्या या आवाहनामुळे युतीतील ही धुसफूस चव्हाट्यावर आलीय. मात्र ही धुसफूस एकनाथ शिंदे बंड करून महायुतीत सामील झाल्यापासूनची आहे. कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यात भाजप विरुद्ध शिंदेसेना असा संघर्ष अनेकदा पाहायाला मिळालाय. त्यातच ठाणे आणि कल्याण- डोंबिवली महापालिकेसाठी भाजपनं स्वबळाचा नारा दिल्यानं शिंदेसेनेतही अस्वस्थता आहे.

Maharashtra Politics:
फोडाफोडीनंतर स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत भाजपचा नवा डाव; उमेदवारीत बदल, दिग्गजांना बसणार धक्का

गेल्या काही वर्षांपासून भाजपनं ठाणे आणि कल्याण- डोंबिवलीमध्ये इतर पक्षातील नेत्यांची इनकमिंग करून आपली संघटनात्मक ताकद वाढवण्याचा चांगलाच प्रयत्न केलाय. त्यामुळे या दोन्ही महापालिकेत भाजप आणि शिंदेसेनेची ताकद नेमकी कशी आहे पाहूयात. 2015 साली झालेल्या महापालिका निवडणुकीप्रमाणे कल्याण- डोंबिवलीत एकत्रित शिवसेनेचे 53,भाजपचे 43 नगरसेवक निवडून आले होते. तर ठाणे महापालिकेत 2017 ला तत्कालीन शिवसेनेच 57 आणि भाजपचे 8 नगरसेवक निवडून आले होते.

Maharashtra Politics:
Local Body Election: मत नाही तर निधी नाही; नेत्यांची गुंडगिरी, मतदारांना धमक्या?

मात्र आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजप आणि शिंदेसेनेपुढे मोठं आव्हान निर्माण होणार आहे. ठाणे, कल्याण- डोंबिवलीत भाजप आणि शिंदेसेनेतील हा अंतर्गत वाद आता महापालिका निवडणुकांपर्यंत थंडावतो की अधिक चिघळतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com