ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

mumbra crime news : महिलेने बॉयफ्रेंडला थंड डोक्याने संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बॉयफ्रेंडची हत्या करताना गर्लफ्रेंडला तिचा नवरा आणि भावानेही साथ दिली.
mumbra crime news
mumbra crime Saam tv
Published On
Summary

मुंब्रा भागातून उघडकीस आलं हादरवणारं हत्याकांड

गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं

हत्या केल्यानंतर मृतदेह थेट हिरव्या ड्रममध्ये भररला

मुंबईजवळील मुंब्रा भागातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने नवरा आणि भावाच्या साथीने बॉयफ्रेंडची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . हत्या केल्यानंतर मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला. मुंब्रा पोलिसांनी तांत्रिक तपास आणि मोबाईल लोकेशनचा आधार घेत हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे.

मुंब्रा येथे राहणारा अरबाज मकसून अली खान हा ३ ऑगस्ट २०२६ रोजी कामासाठी घरातून निघाला. परंतु कामाला निघालेला अरबाज घरी परतलाच नाही. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा ठावठिकाणा घेतला.. परंतु दिवसभर कुठेच सापडला नाही. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली.

पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर अरबाजचे कॉल डिटेल्स आणि लोकेशनची तपासणी करण्यास सुरुवात केली. अरबाजचे शेवटचे लोकेशन वर्सोवा भागात सापडलं. तपासादरम्यान पोलिसांना अरबाजची गर्लफ्रेंड मेहजबीन शेखचे लोकेशन देखील त्याच भागात आढळून आलं.

पोलिसांना संशय वाढल्याने मेहजबीनची चौकशी करण्यास सुरुवात केली. मेहजबीन ही सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करत होती. परंतु कसून चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर मेहजबीनने धक्कादायक खुलासा केला. मेहजबीनने चौकशीदरम्यान कबुल केले की, नवरा हसन आणि भाऊ तारिक शेखच्या मदतीने अरबाजकडून पैसे उकळणे आणि हत्या करण्याचा कट रचला होता.

त्या दिवशी काय घडलं?

आरोपींनी अरबाजला पैशांसाठी वर्सोवाला बोलावले. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने त्याचे हात-पाय बांधले. त्यानंतर त्याला प्लास्टिक पाइपने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह एका हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये भरून मुंब्रा भागातील निर्जन ठिकाणी असलेल्या नाल्यात फेकला. आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंब्रा पोलिसांनी कारवाई करत मेहजबीन शेख, तारीक शेखला अटक केली. तर आरोपी महिलेचा पती हसन आणि त्याचा साथीदार मुजम्मल पाठण फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात हत्या, हत्येचा कट रचण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मुंब्रा पोलिसांनी तांत्रिक तपास, जलद गतीने कारवाई केल्याने हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. सध्या पोलीस फरार आरोपींच्या शोधात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com