Mumbai-Thane Travel: मुंबई- ठाणे फक्त २५ मिनिटांत, विनासिग्नल प्रवास नेमका कसा होईल?

Chedanagar to Anandnagar Elevated Road: मुंबईवरून आता ठाणे प्रवास सुसाट होणार आहे. छेडानगर ते आनंदनगरपर्यंत उन्नत मार्गाचे काम सुरू आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते ठाणे प्रवास २५ मिनिटांचा होईल.
Mumbai-Thane Travel: मुंबई- ठाणे फक्त २५ मिनिटांत, विनासिग्नल प्रवास नेमका कसा होईल?
Mumbai-Thane TravelSaam Tv
Published On

Summary -

  • मुंबई ते ठाणे प्रवास २५ मिनिटांचा होणार

  • छेडानगर ते आनंदनगर उन्नत मार्ग तयार केला जाणार

  • १३.९ किमींचा उन्नत मार्ग तयार केला जात आहे

  • या प्रवास पूर्णपणे विनासिग्नल असणार आहे

मुंबईसोबतच ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईवरून थेट ठाण्याला तुम्हाला आता फक्त २५ मिनिटांत पोहचता येणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए छेडानगर ते आनंदनगरपर्यंत उन्नत मार्ग तयार करणार आहे. महत्वाचे म्हणजे हा प्रवास विनासिग्नल असणार आहे. या मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काही वर्षामध्ये मुंबईकरांना ठाण्यात अगदी काही मिनिटांमध्ये पोहचता येणार आहे. यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून देखील सुटका होणार आहे.

दक्षिण मुंबईला पूर्व उपनगरांशी जोडण्यासाठी पूर्व मुक्त मार्गाची आवश्यकता आहे. या मार्गाची सुरूवात दक्षिण मुंबईतील पी डिमेलो रस्त्यावरून होईल. तर या मार्गाचा शेवट पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपनजीकच्या छेडानगर जंक्शनजवळ होतो. हा मार्ग १६.८ किलो मीटर लांबीचा आहे. हा मार्ग २०१३ मध्ये सुरू झाला होता. या मार्गामुळे दक्षिण मुंबईतील अनेक भागात राहणाऱ्या नागरिकांना चांगला फायदा झाला. कारण यामुळे प्रवास सुसाट झाला तसंच वाहतूक कोंडी देखील कमी झाली.

Mumbai-Thane Travel: मुंबई- ठाणे फक्त २५ मिनिटांत, विनासिग्नल प्रवास नेमका कसा होईल?
Mumbai Railway: मुंबईतील रेल्वे स्थानकांचा कायापालट, २० नवीन प्लॅटफॉर्म बांधले जाणार; रेल्वेची ब्लू प्रिंट कशी आहे?

पण आता छेडानगर येथून पुढे ठाण्यापर्यंत पोहचण्यासाठी उन्नत मार्ग तयार केला जात आहे. दक्षिण मुंबई ते ठाणे प्रवास सुसाट होण्यासाठी छेडानगर (घाटकोपर) ते आनंदनगर (ठाणे) उन्नत मार्ग महत्वाचा ठरणार आहे. या मार्गामुळे ठाणे ते मुंबई प्रवास २५ मिनिटांचा होणार आहे. हा मार्ग १३.९ किलोमीटरचा असणार आहे. या मार्गासाठी ३,३१४ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या मार्गाचे काम सध्या सुरू आहे. पाइल्स आणि पियर कास्टिंगचे काम प्रगतीपथावर आहे अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Mumbai-Thane Travel: मुंबई- ठाणे फक्त २५ मिनिटांत, विनासिग्नल प्रवास नेमका कसा होईल?
Mumbai Delhi Expressway: मुंबई ते दिल्ली सुसाट! २४ तासांचा प्रवास आता फक्त १२ तासात; कसा असेल महामार्ग?

महत्वाचे म्हणजे, छेडानगर ते आनंदनगर या उन्नत मार्गावर एकही सिग्नल नसणार आहे. हा मार्ग १३.९ किमीचा असणार आहे. या मार्गावर प्रत्येक दिशेच्या वाहतुकीसाठी ३ लेन असणार आहेत. हा मार्ग तयार होण्यासाठी ४ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या मार्गावर नवघर उड्डाणपूल येथे ३- ३ पदरी उन्नत टोल प्लाझा उभारला जाणार आहे. मुलुंड चेकनाका, ऐरोली जंक्शन आणि विक्रोळी जंक्शन येथे २ पदरी अप-डाऊन रॅम्प उभारले जाणार आहेत. हा मार्ग तयार करण्यासाठी सिंगल पाइल आणि सिंगल पियर या प्रणालीचा वापर केला जाणार आहे.

Mumbai-Thane Travel: मुंबई- ठाणे फक्त २५ मिनिटांत, विनासिग्नल प्रवास नेमका कसा होईल?
Mumbai Bullet Train : ...तर मुंबईतील बुलेट ट्रेनचं काम बंद होणार?, BMC ॲक्शन मोडवर, तीन दिवसांत उत्तर मागितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com