मोठी बातमी : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डहाणूकडे जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं; प्रवासी हैराण

Mumbai Western Railway: पश्चिम रेल्वेची डहाणूकडची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. सफाळे ते केळवेपरोड दरम्यान रेल्वेत बिघाड झाला आहे. गुजरातकडे जाणाऱ्या या रेल्वेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Mumbai Western Railway
Mumbai Western Railway TrafficSaam Tv News
Published On

मुंबई : मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेची डहाणूकडची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. सफाळे ते केळवेपरोड दरम्यान रेल्वेत बिघाड झाला आहे. गुजरातकडे जाणाऱ्या या रेल्वेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. डहाणूकडे जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. पालघरमधील सफाळे ते केळवेपरोड दरम्यान बिकानेर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असल्याचं समोर आलं आहे. डहाणूपर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. डहाणूकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या २० ते २५ मिनिटं उशीराने धावताय. डाऊन मार्गावरील पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरील देखील परिणाम झाल्याचं समोर आलं असन अप लाईनवरील वाहतूक सुरुळीत सुरु आहे.

दरम्यान, हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी देखील कालचा दिवस त्रासदायक ठरला आहे. गोवंडी ते मानखुर्द दरम्यान, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी लोकल मध्येच थांबली. त्यामुळे संपूर्ण हार्बर मार्गावरील वाहतूक २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या.

Mumbai Western Railway
Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! ग्रामपंचायत सदस्याची भरदिवसा हत्या, कोयत्याने सपासप वार करत संपवलं; थरारक VIDEO

रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाल्याचं समोर आलं होतं. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरलं होतं. प्रवासी वैतागून रेल्वे रूळांवरून पुढील प्रवास करत घरी निघाले होते.

Mumbai Western Railway
Beed Crime : कोयता पाठीमागे लपवून आणला, भाजप कार्यालयासमोरच आडवा पाडून कोयत्याने भोसकलं, बीडमध्ये रक्तरंजित थरार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com