Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, उद्या अनेक भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Tanasa Pipeline Break Near Powai: पवई अँकर ब्लॉकजवळ तानसाच्या १८०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्याप्रमाणात पाणी वाया गेले. या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे कामकाज युद्ध पातळीवर सुरू आहेत.
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, उद्या अनेक भागात पाणीपुरवठा राहणार बंद
Mumbai Water CutSaam Tv
Published On

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे. पवईमध्ये आज दुपारी १ वाजता ही घटना घडली. पवई अँकर ब्लॉकजवळ तानसाच्या १८०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्याप्रमाणात पाणी वाया गेले. या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे कामकाज युद्ध पातळीवर सुरू आहे.

ही जलवाहिनी फुटल्यामुळे एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्‍यामुळे शुक्रवारी आणि शनिवार काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तर काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या भागमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आले आहे.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, उद्या अनेक भागात पाणीपुरवठा राहणार बंद
Mumbai Local Train : लोकल ट्रेनच्या गर्दीवर उतारा काय? प्रवासी संघटनांना काय वाटतं?

मिळालेल्या माहितीनुसार, पवईमध्ये आज दुपारी तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनी दुपारी १ वाजेच्‍या सुमारास फुटली. या जलवाहिनीतून मोठ्याप्रमाणात पाणी वाया गेले. बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत जलवाहिनीवरील व्‍हॉल्‍व्‍ह बंद करून पाणी गळती बंद केली. तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद करून दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पुढच्या २४ तास हे काम सुरू राहण्‍याची शक्यता आहे. यामुळेच एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, उद्या अनेक भागात पाणीपुरवठा राहणार बंद
Mumbai Crime : धक्कादायक! बापाने दोन वर्षांच्या लेकाला दीड लाखात विकलं; काही दिवसांपूर्वीच मुलाच्या आईचा मृत्यू, VIDEO

या भागात पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम -

के पूर्व विभाग -

- प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी १/२, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत, मुकुंद रुग्णालय, टेक्निकल परिसर, इंदिरा नगर, मापकंद नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग, चिमटपाडा, सानबाग, मरोळ, एम. आय. डी. सी. परिसर, रामकृष्ण मंदीर मार्ग, जे. बी. नगर, बागरखा मार्ग, कांती नगर या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

- सहार रोड, कबीर नगर, बामणवाडा, पारशीपाडा, विमानतळ वसाहत, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, दौलतवाडी, पी. एन. टी. वसाहत या भागात पाणीपुरवठा बंद राहील.

- मिलिटरी मार्ग, विजय नगर, मरोळ-मरोशी मार्ग या भागात पाणीपुरवठा बंद राहील.

- मुलगाव डोंगरी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. आय. डी. सी.) मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडिविटा, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, वाणी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज या भागात पाणीपुरवठा बंद राहील.

- ओम नगर, कांती नगर, राजस्थान गृहनिर्माण संस्था, साईनगर, सहार गांव, सुतार पाखाडी, कार्गो संकुल या भागात पाणीपुरवठा बंद राहील.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, उद्या अनेक भागात पाणीपुरवठा राहणार बंद
Mumbai Crime News : ऐकावं ते नवलच! पोलिसांच्याच घरी टाकला डाका, दरोडेखोराने १३ पोलिसांची घरं फोडली

एच पूर्व विभाग –

- वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसर, बेहरामपाडा या भागात पाणीपुरवठा बंद राहील.

जी उत्तर विभाग –

- धारावी या भागात पाणीपुरवठा बंद राहील.

एस विभाग -

- गौतम नगर, जयभीम नगर भागात पाणीपुरवठा बंद राहील.

- फिल्टरपाडा, बेस्ट सर्कल, गांवदेवी, इस्लामिया चाळ या भागात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

- पठाणवाडी, महात्मा फुले नगर या भागात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

- कैलास नगर, पासपोली गाव, निटी परिसर, अमृत हॉटेल लगतच्या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, उद्या अनेक भागात पाणीपुरवठा राहणार बंद
Picnic Spots in Mumbai: मुंबईजवळ हटके पिकनिक स्पॉट, कुटुंबाला घेऊन ५ ठिकाणी नक्की भेट द्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com