Mumbai Hit and Run: मुंबईत पुन्हा हिट ॲण्ड रन! भरधाव कारने ४ वर्षीय मुलाला चिरडले, मुलाचा जागीच मृत्यू

Mumbai Wadala Accident Case: वडाळ्यात भीषण अपघात घडलाय. ४ वर्षाच्या चिमुकल्याला कारनं चिरडलं असून मुलाचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Wadala Accident
Wadala AccidentSaam tv
Published On

Wadala Accident: मुंबईत अपघातांचे सत्र सुरूच आहे. अपघातांची मालिका सुरू असताना वडाळा परिसरात हिट अण्ड रनची घटना घडली. वडाळ्यातील आंबेडकर कॉलेजजवळ एका कारनं चार वर्षाच्या मुलाला चिरडलं आणि तेथून पलायन केलं. या अपघातात निष्पाप मुलाचा अंत झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चारचाकी चालवणाऱ्या आरोपीचं नाव भूषण संदीप गोळे आहे. तो विलेपार्ले येथील रहिवासी आहे. तो ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भूषणला अटक केली आहे. तसेच अपघातातील लहान मुलाचा शवविच्छेदनासाठी केईएम रूग्णालयात पाठण्यात आलं असून, आयुष लक्ष्मण किनवडे असे मृत चिमुकल्याचं नाव आहे.

Wadala Accident
Brazil Accident: ब्राझीलमध्ये भीषण अपघात, बस आणि ट्रकची जोरदार धडक, ३८ जणांचा होरपळून मृत्यू

नेमकं घडलं काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष हा त्याच्या आई वडिलांसोबत वडाळ्यातील आंबेडकर कॉलेजजवळील फूटपाथवर राहत होता. त्याचे वडील मजूर आहेत. शनिवारी सायंकाळी आरोपी भूषण संदीप गोळे आंबेडकर कॉलेज जवळील परिसरात यु-टुर्न घेत होता, त्याच वेळी आयुष गाडीच्या चाकाखाली आला. या अपघातात चिमुकल्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपी भूषणने तेथून पलायन केलं.

Wadala Accident
Jeep Accident: जीप ८ वेळा उलटली, प्रवाश्यांना खरचटलंही नाही; उतरून त्यांनी मागितला चहा

आयुषला कार अपघातात गंभीर दुखापत झाली, त्यामुळे त्याला ताताडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी आयुषला मृत घोषित केलं. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं. तसेच या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत. चिमुकला आयुषचा असा अंत झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com