Jeep Accident: जीप ८ वेळा उलटली, प्रवाश्यांना खरचटलंही नाही; उतरून त्यांनी मागितला चहा

Jeep Accident Viral Video: नागौरहून बिकानेरच्या दिशेनं एक जीप जात होती. जीपचा भीषण अपघात घडला. जीप ८ वेळा उलटली. सुदैवानं प्रवासी सुखरूप आहेत, त्यांना साधं खरचटलंही नाही.
Jeep Accident
Jeep AccidentSaam Tv News
Published On

नागौर शहराच्या बीकानेर रोडवर जीप ८ वेळा उलटली. या दुर्घटनेतील आश्चर्यकारक बाब म्हणजे कुणाला साधं खरचटलंही नाही. एवढंच नाही तर सर्वजण एक एक करून बाहेर आले आणि होंडा एजन्सीमध्ये जाऊन बसले. नंतर त्यांनी चहाची मागणी केली. ही घटना धक्कादायक तर होती, पण त्यांनी गाडीबाहेर उतरून चहा मागितला ज्यामुळे लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

ही संपूर्ण घटना राजस्थानच्या नागौर शहरात शुक्रवारी घडली. या अपघाताचा सीसीटिव्ही फुटेज सध्या सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओ एक जीप दिसत आहे. जी भरधाव वेगानं येत आहे. भरधाव वेगात आलेली जीप ८ वेळा उलटली आणि जाऊन होंडा एजन्सीच्या गेटसमोर थांबली. जीपमधील प्रवासी सुखरूप असून त्यांना खरचटलंही नाही.

Jeep Accident
Rajasthan: सासूच्या मृत्यूने दु:ख अनावर; रडत सुनेचाही मृत्यू, एकाच चितेवर दोघींचे अंत्यसंस्कार

नेमकं घडलं काय?

नागौरहून बिकानेरच्या दिशेनं एक जीप जात होती. त्यात ५ प्रवासी प्रवास करत असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, होंडा एजन्सीजवळ जीप नियंत्रणाबाहेर गेली. ज्यामुळे ती ८ वेळा उलटली. ८ वेळा उलटल्यानंतर होंडा एजन्सीच्या गेटवर जाऊन थांबली. गेटमुळे जीप एजन्सीजवळ थांबली. यावेळी एक प्रवासी बाहेर पडला.

Jeep Accident
Rajasthan: 150 फूट बोअरवेलमध्ये अडकलेल्या 5 वर्षीय मुलाचा मृत्यू, 55 तास चालले बचावकार्य

खरचटलंही नाही, बाहेर आल्यानंतर प्रवाश्यांनी चहा मागितला

होंडा एजन्सीच्या गेटवर आदळलेली जीपमधून एक प्रवासी बाहेर पडला. जेव्हा होंडा एजन्सीच्या गेटवर जाऊन आदळली आणि थांबली, तेव्हा एक एक करून ४ लोक बाहेर आले, आणि होंडा एजन्सीमध्ये जाऊन बसले. एजन्सीमध्ये काम करणारा व्यक्ती सचिन ओझा यांनी सांगितलं की, जीपचा भीषण अपघात झाला. मात्र, या गाडीत बसणाऱ्या प्रवाश्यांना साधं खरचंटलं देखील नाही. ही आश्चर्याची बाब आहे. उतरल्यानंतर प्रवाश्यांनी चहा मागितला.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com