Mumbai Senate Election : मुलाचं कौतुक, आईला अप्रुप; सिनेटचा विजयानंतर मातोश्रीवर भावनेचा पूर, पाहा व्हिडिओ

aaditya thackeray News : मुंबई विद्यापीठातील सिनेट विजयानंतर जल्लोष पाहायला मिळाला. सिनेट विजयानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकच जल्लोष केला.
मुलाचं कौतुक, आईला अप्रुप; सिनेटचा विजयानंतर मातोश्रीवर भावनेचा पूर, पाहा व्हिडिओ
Mumbai Senate ElectionSaam tv
Published On

मुंबई : आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेनं मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत निर्भेळ यश मिळवलंय. मुलाचं यश आईला सुखावतं. रश्मी ठाकरेही मुलाच्या कर्तृत्वानं भारावून गेल्या आहेत. मातोश्रीवरील जल्लोषात याची झलक दिसली.

आदित्य ठाकरे यांनी आईला विजयाचा गुलाल लावला. एव्हढच नव्हे तर आदित्य यांनी आपल्या आईला आनंदानं कडकडून मिठीही मारली. मुलाच्या कर्तृत्वाने रश्मी ठाकरे भारावून गेल्या होत्या. मुलाचं यश आईला सुखावतं. सिनेट निवडणुकीत युवा सेनेला निर्भेळ यश मिळाल्यानंतर मातोश्रीवर भावुक क्षण पहायला मिळाले. आदित्यने आईबरोबरच मावशीलाही गुलाल लावला. आदित्य यांचा लहान भाऊ तेजस राजकारणात सक्रीय नाही. पण उद्धव, आदित्यच्या काही सभांना तो आवर्जून हजेरी लावतो.

सिनेटच्या विजयानं तेजसही आनंदीत झाला. गुलाल लावत त्याने आदित्यला मिठी मारली. भावाच्या नेतृत्व कौशल्याची झलक या विजयातून दिसली आहे. त्यामुळे तेजसच्या देहबोलीतून भावाचा अभिमान दिसत होता. त्यामुळे अगदी देहभान हरपून तेजस नाचत होता. मावसभाऊ वरुण सरदेसाईंचीही आदित्य यांना नेहमीच भक्कम साथ असते. मातोश्रीवर आदित्यनं वरुणला पेढा भरवत आनंद व्यक्त केला.

मुलाचं कौतुक, आईला अप्रुप; सिनेटचा विजयानंतर मातोश्रीवर भावनेचा पूर, पाहा व्हिडिओ
Kalyan Political News: कल्याणमध्ये शिंदे गटातील इच्छुकांची यादी वाढली, भाजप आमदारांच्या कमानी शेजारीच शिंदे गटाच्या इच्छुकाचा बॅनर

आता ठाकरे कुटुंबाचा हा आनंद विधानसभा निवडणुकीनंतरही टिकणार का ? याकडे सगळ्याचं लक्ष असणार आहे. कारण ठाकरे कुटुंब सध्या मोठ्या संघर्षातून जातं आहे. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड पुकारलं. ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. एव्हढा मोठा आघात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबांनी पचवला. एकीकडे कोर्टात लढाई आणि दुसरीकडे जनतेत जाऊन उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणूक त्वेषानं लढवली.

मुलाचं कौतुक, आईला अप्रुप; सिनेटचा विजयानंतर मातोश्रीवर भावनेचा पूर, पाहा व्हिडिओ
Political News : ''आमचं बरंचसं ठरलंय''; 'त्या' मागणीवर अजितदादांचे स्पष्टीकरण

ठाकरे गटाला यश मिळालं. या संघर्षात पुत्र आमदार आदित्य ठाकरेही पित्याच्या खांद्याला खांदा देऊन साथ देत आहेत. मुंबई विद्यापीटाच्या सिनेट निवडणुकीत आदित्य यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेनं कमाल केली. 10 पैकी 10 जागा जिंकत अभाविप आणि मनसेला धूळ चारली. आता मुलाच्या विजयाचं अप्रूप आईला नसेल तर नवल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com